सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील निंबुत येथे भैरवनाथ यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या बैलगाडा शर्यती मध्ये करंजेपुल येथील दादा गायकवाड बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावला.
निंबुतचे ग्रामदैवत भैरवनाथ यात्रे निमित्त भरवण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीत एकूण १४७ गाड्या धावल्या.
सकाळी ११ वाजता ज्येष्ठ ग्रामस्थांच्या हस्ते श्रीफळ फोडून शर्यतीला सुरुवात झाली. यावेळी एकूण ३० गट फेरे पर पडले.या फेऱ्यात प्रथम आलेली गाडी सेमी फायनल ल पात्र ठरली.यामध्ये एकूण पाच सेमी फायनल झाले. सेमी जिंकणारी गाडी फायनल साठी पात्र ठरली.
नन मावळत्या सूर्याच्या साक्षीने सायं सहा वाजता अतिशय उत्कंठा वर्तक फायनल मध्ये दादा गायकवाड करंजेपुल यांच्या बाजीने, बाजी मारली व सुमारे ७१ हजार रुपये आपल्या नावी केले.
तर द्वितीय क्रमांकाचे मानकरी निंबुतचे चंद्रशेखर वामनराव काकडे ठरले व रोख रक्कम ५१ हजार आपल्या नावी केले. तिसरा क्रमांक देखील निंबुत च्या अमरदीप चंद्रशेखर काकडे यांच्या गाडीने पटकावला व ४१ हजाराचे बक्षीस आपल्या नावे केले.
अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक निंबुतच्याच चंद्रशेखर वामनराव काकडे व बाप्पू चौधर यांच्या गाडीने पटकावला. त्यांनी अनुक्रमे ३१ हजार व ११ हजार रुपयांचे मानकरी ठरले.
या मैदानाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एकदा नंबर टाकून गाडी पळवली की दुसऱ्यांदा गाडी पळवता येत नाही.हे फक्त निंबुत व कोरेगव मैदानावर पाहायला मिळते.यावेळी सर्व बैलांचे फिटनेस सर्टिफिकेट देखील घेतले गेले. शर्यत यशस्वी होण्यासाठी मा सभापती प्रमोद काकडे सो.का माजी चेअरमन शहाजी काकडे, संचालक अभिजित काकडे. युवानेते गौतम काकडे, मा संचालक महेश काकडे, उपसंरपंच अमर काकडे,मा. उप सरपंच उदय काकडे, व भैरवनाथ यात्रा उत्सव कमिटी निंबुत यांनी मोलाचे सहकार्य केले.