वाई ! अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी एकास अटक : वाई पोलिसांची कारवाई

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
 वाई : प्रतिनिधी
वाई तालुक्यातील एका गावातील इयत्ता नववीत  शिकणाऱया एका अल्पवयीन मुलीला मोबाईल व कपडे देतो असे सांगून २५ वर्षाच्या युवकाने बलात्कार केल्याची घटना दि.१५ रोजी  घडली. या प्रकरणी वाई पोलिसांनी त्या युवकास अटक केली आहे.
         याबाबत मिळालेली माहिती अशी, वाई तालुक्यातील एका गावात नववीत शिकणाऱया मुलीला तुला नवीन कपडे देतो, तुला मोबाईल देतो असे सांगून त्याच्या चुलत्याच्या माडीवर त्या युवतीला तो घेवून गेला. त्या युवतीच्या इच्छेविरुद्ध त्या युवकाने तिच्याशी शारिरीक संबंध ठेवले. यावरुन त्या युवतीने वाई पोलीस ठाण्यात दि.१६ रोजी त्या युवकावर गुन्हा दाखल केला. वाई पोलीस ठाण्याचे एपीआय आशिष कांबळे यांनी लगेच घटनास्थळी भेट देवून संशयित युवकास अटक केली आहे. याचा तपास एपीआय कांबळे हे करत आहेत.
To Top