सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : महेश जगताप
बारामती तालुक्यातील आजी माजी सैनिकांनी एकत्र येत २०२० साली सैनिक महाउद्योग कंपनीची स्थापना केली. या कंपनीतून तयार होणाऱ्या मसाले आणि लोणचे लोकांच्या जिभेवरील चव बनले असून पुणे येथील पहिल्या आउटलेट नंतर नुकताच वाणेवाडी ता. बारामती याठिकाणी या कंपनीच्या दुसऱ्या आउटलेट शॉप चे उदघाटन पार पडले.
वाणेवाडी ता.बारामती येथे माजी सैनिकांनी एकत्रित येऊन सैनिक महाउद्योग कंपनी च्या आउटलेट चे वाणेवाडी गावचे सरपंच गीतांजली जगताप यांच्या हस्ते उदघाटन झाले याप्रसंगी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक ऋषी गायकवाड , निलेश गायकवाड ,वाघळवाडी गावचे सरपंच हेमंत गायकवाड ,वाणेवाडी चे मा. सरपंच दिग्विजय जगताप तसेच लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे तसेच adv. गणेश आळंदीकर, पत्रकार महेश जगताप, पत्रकार युवराज खोमणे,मोहन गायकवाड , बाळासाहेब चव्हाण , या सर्वांच्या उपास्थीतीत उस्ताहात पार पडला.
सैनिक महाउद्योग कंपनी ची स्थापना तीन वर्षापूर्वी झाली होती. ही कंपनी माजी सैनिकांनी एकत्रित येऊन स्थापन केलेली आहे आणी या आउटलेट मध्ये कंपनी चे सर्व प्रकारचे मसाले, लोणची , चटण्या , ड्रायफ्रूट् होलसेल दरात मिळण्याचे ठिकाण या आउटलेट वर असणार आहे असे कंपनी चे संचालक प्रशांत शेंडकर यांनी सांगितले. कंपनी चा मेन्यूफेक्चरिंग प्लांट चोपडज येथील पांढरवस्ती येथे आहे आणी याचे ही आज उदघाटन चोपडज गावचे सरपंच जगताप यांच्या हस्ते झाले.
कंपनी ने कमी कालावधीत आपली अनेक दर्जेदार मसाले उत्पादने बाजारात आणलेली आहेत यात सर्व प्रकारचे मसाले आहेत.कंपनी आउटलेट मध्ये सर्व प्रॉडक्ट माफक दरात ग्राहकांसाठी उपलब्ध असतील.