सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर ( प्रतिनिधी )
बारामती तालुका आजी-माजी सैनिक संघटना सोमेश्वर नगर व स्पोर्ट अकॅडमी सोमेश्वर नगर यांच्यावतीने सैनिक सेवानिवृत्तीनंतर लेखी व शारीरिक परिक्षेत उत्तम गुण मिळवुन महाराष्ट्र पोलीस मधे भर्ती झालेले रामदास कारंडे ,संदीप जगताप ,राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत दुसरी आलेली वैष्णवी नितीन शेंडकर तसेच राष्ट्रीय ॲथलिट स्पर्धेत निवड झालेला वाघळवाडी चा क्रिडापटु सुजल सोमनाथ सावंत ,विवेकानंद अभ्यासीका चे गणेश सावंत ई चा सत्कार करणेत आला .
लातुर जिल्हा क्रिडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांचे अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला . सैनिक आयुष्यभर जवान असतो हे सैनिकानी निवृत्तीनंतर ही भरती होवुन सिद्ध केले आहे असे म्हणून सुजल सावंत सारखा राष्ट्रीय धावपटू आपल्या परिसरातुन घडत आहे त्याला सामाजिक संस्थानी पाठबळ द्यावे असे आवाहन त्यानी यावेळी केले .
प्रास्ताविक तक्रार निवारण कमिटी अध्यक्ष ॲड गणेश आळंदीकर यानी केले गुणवंताना प्रोत्साहन देणेसाठी नियमीत सैनिक संघटनेचे कार्य चालु असल्याचे ते म्हणाले .
यावेळी सैनिक संघटना अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर ,कार्याध्यक्ष बाळासाहेब गायकवाड,पत्रकार संतोष शेंडकर ,राजाराम शेंडकर ,उपाध्यक्ष रामचंद्र शेलार ,ॲड गणेश आळंदीकर ,भाऊसाहेब लकडे दत्तात्रय चोरगे ,नितीन शेंडकर ,तानाजी भंडलकर ,विक्रम लकडे ,तुकाराम सोरटे ,युवराज चव्हाण ई मान्यवर यावेळी हजर होते .