सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर - कापूरव्होळ मार्गालगत कृषिप्रधान संगमनेर ता.भोर येथे शिवजयंतीनिमित्त रविवार दि.१६ रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. रक्तदान शिबिरात रक्तदान हेच श्रेष्ठ दान समजून ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
येसाजी कंक जलाशय शेजारील संगमनेर येथे शुक्रवारी दि.२१ थाटामाटात शिवजयंती साजरी होणार असून त्यानिमित्त पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि.१६ भव्य रक्तदान शिबिरात महिला ,तरुण वर्ग व नागरिकांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला.दरम्यान प्रत्येक रक्तदात्यास भेटवस्तू देण्यात आली.सदर रक्तदान शिबिराचे आयोजन संगमनेर गावातील स्वराज्य मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले. या शिबिराचे कामकाज ओम ब्लड सेंटर पुणेच्या डॉ प्रज्ञा कदम, प्रंजाली नलावडे, प्रवीण चौधरी, स्मिता गायकवाड यांनी पाहिले.यावेळी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
COMMENTS