सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मोरगाव : प्रतिनिधी
बारामतीच्या 'तरडोली' पाझर तलावात सध्या गाळ उपसा सुरू आहे. येथून उपसा होणारी माती शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात टाकावी असे शासनाचे धोरण आहे. परंतु बारामती महसूल विभाग व नाझरे पाटबंधारे विभाग अधिकाऱ्यांनी नामी शक्कल लढवत मातीची विक्री करण्याचा सल्ला काही ठेकेदारांना दिला आहे. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी अशी मागणी आहे.
येथील काही व्यावसायिक या मातीची विक्री करत असल्याचे समोर आलय. याविरुद्ध कारवाई करण्याऐवजी प्रशासनातील अधिकारी गैर कृती करणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याच्या तक्रारी आहेत. आर्थिक लाभांमुळे यांच्या विरुद्ध कोणीही तक्रार केली तर ? तत्काळ गैर कृत्य करणाऱ्यांना ही माहिती दिली जाते. प्रत्यक्ष नाममात्र माती उपशाची परवानगी घेऊन हजारो 'ब्रास' मातीचा उपसा केला जातो.
शासनाच्या अनेक योजना ह्या सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून तयार होतात. परंतु प्रशासनातीलच काही कर्मचारी व अधिकारी याचा स्वतःच्या सोयीने अर्थ काढतात. नाझरे धरण अधिपत्याखाली तरडोली हा पाझर तलाव आहे. या तलावातील काढलेल्या गाळ हा लगतच्या शेतकऱ्यांना उपयोगात यावा असे शासनाचे धोरण आहे. यानुसार सध्या गाळ उपसायला परवानगी देण्यात आलीय.
बारामती महसूल प्रशासन व नाझरे पाटबंधारे विभाग यांच्या संयुक्तपणे हे काम सध्या सुरू आहे. सर्व शासनाचे नियम डाउनलोड मनमानी पद्धतीने हे काम केले जाते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करून वस्तुस्थितीचा पंचनामा करावा अशी मागणी आहे. स्थानिक अधिकारी आर्थिक संबंधामुळे कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप आहे.
सध्या येथील तलावातून होणारा संपूर्ण माती उपसा शासनाने रॉयल्टी मुक्त केले आहे. यामुळे ठेकेदार दुहेरी बाजूने फायद्यात आहेत. केवळ दोन खात्याच्या अधिकाऱ्यांची तुंबडी भरून राजरोसपणे हा गैरव्यवसाय केला जातो. या प्रकरणाची पुणे जिल्हाधिकारी यांना माहिती देण्यात आली असून पुढील कारवाईकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.