सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅन्ड टेक्नॉलॉजी सोमेश्वरनगर आणि कॅपजेमिनी कंपनी यांच्यात नुकताच सामंजस्य करार पार पडला.
देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या सुचनेनुसार सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व विश्वस्त मंडळ आणि कॅपजेमिनी या आंतरराष्ट्रीय कंपनीचे समन्वयक डॉ. संतोष भोसले यांच्या सहकार्यातून सी.एस.आर. इनिशिएटिव्ह च्या माध्यमातुन आंतरराष्ट्रीय कंपनी कॅपजेमीनी या कंपनीशी सामंजस्य करार झाला होता.
त्यानुषंगाने शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅन्ड टेक्नॉलॉजी सोमेश्वरनगर येथे पहिल्या बॅचला जावा लँग्वेजचे प्रशिक्षण देणेत आले होते. दिनांक १७/०४/२०२३ रोजी प्रमाणपत्र वितरणचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त प्रतिनिधी आनंदकुमार होळकर, एफ.यु.ई.एल. (फ्रेंन्डस युनियन फॉर एनर्जायजींग लाईव्हज) चे प्रोजेक्ट मॅनेजर शाम कुलकर्णी, ट्रेनर अभिषेक वाकोदकर, कॉलेजचे उपप्राचार्य डॉ.शरद गावडे, संगणक विभागाच्या प्रमुख प्रा. सलोनी शहा, कॉलेजचे ट्रेनिंग अॅन्ड प्लेसमेन्ट अधिकारी प्रा.मयुर घाडगे, कॉलेज स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते. येत्या काहि दिवसात लवकरच संगणक प्रणालीतील पायथॉन लँग्वेजचे प्रशिक्षण चालु होणार असल्याची माहिती एफ.यु.ई.एल. चे प्रोजेक्ट मॅनेजर शाम कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना दिली तरी याचा लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.