सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे
मेढा - जावली महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माघारीचे दिवशी ६ जागा बिनविरोध करण्यात राजकारण्यांना यश मिळाले असले तरी १२ जागेसाठी २२ उमेदवारांनी हट्टाहास धरण्याने अखेर निवडणूकीचे बिगुल वाजले आहे.
कृषी पत व बहुउद्देशीय सेवा सह. संस्था मतदार संघातुन सर्वसाधारण ७ जागेसाठी गणेश आनंदा कवी, रविंद्र बबनराव गोळे, लक्ष्मण बाबुराव जाधव, भास्कर आबाजी पवार, मधुकर बबनराव पोफळे, राजेंद्र सखाराम भिलारे, सर्जेराव दादु मर्ढेकर, मच्छिद्र लक्ष्मण मुळीक, हनुमंत सहदेव शिंगटे, जयदिप शिवाजीराव शिंदे, प्रमोद शंकर शिंदे, हेमंत हिंदुराव शिंदे आणि प्रमोद बाजीराव शेलार यांचे अर्ज शिल्लक राहीले आहेत.
ग्रामपंचायत मतदार संघातुन सर्वसाधारण २ जागांसाठी बजरंग पांडुरग गुजर, गुलाब विठ्ठल गोळे, साईबाबा दगडू जगताप आणि बुवासाहेब एकनाथराव पिसाळ तसेच अनुज्ञप्तीधारक व्यापारी, आडते मतदार संघातुन २ जागेसाठी दत्तात्रय कोंडीबा कदम, प्रकाश कृष्णाजी जेधे आणि रमेश लक्ष्मण सपकाळ तर ग्रामपंचायत मतदार संघातील अनुसचित जाती / जमाती प्रतिनिधी च्या एका जागेसाठी विद्या तुकाराम कदम आणि पांडूरंग कारंडे निवडणूकीच्या रिंगणात उतरलेले आहेत.
कृषी पत व बहुउद्देशीय सेवा सह. संस्था मतदार संघातुन महिला प्रतिनिधी कमल दिलीप दळवी व योगिता राजेंद्र शिंदे तसेच कृषी पत व बहुउद्देशीय सेवा सह. संस्था मतदार संघातुन इतर मागास प्रवर्ग प्रतिनिधी मनेश जयसिंग फरांदे बिनविरोध झाले असुन कृषी पत व बहुउद्देशीय सेवा सह. संस्था मतदार संघातुन विमुक्त जाती भटक्या जमाती प्रतिनिधी तुकाराम जानु शिंदे तर ग्रामपंचायत मतदार संघातुन आर्थिक दृष्टया दुर्बल घटक प्रतिनिधी रामचंद्र धोंडीबा भोसले तसेच हमाल, मापाडी मतदार संघातुन सुंदर गोंविद भालेराव हे बिनविरोध निवडून आले आहेत.
जावली महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीची १२ जागेसाठी दि. २८ रोजी मतदान होणार असून दि. २९ रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गणेश देशमुख यांनी दिली. निवडणूक निरक्षक तथा अप्पर जिल्हाधिकारी जिवन गलांडे यांचे मार्गदशनाखाली सहाय्यक निरीक्षक तथा नायब तहसिलदार बैलकर हे यावेळी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी नानासाहेब रूपवनवर व सहा. निवडणूक निर्णय अधिकारी गणेश देशमुख हे काम पहात आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता.