बारामती ! कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १७ जागांसाठी ३४ उमेदवार निवडणूक रिंगणात : राष्ट्रवादीचा एक उमेदवार बिनविरोध

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
बारामती :प्रतिनिधी
राष्ट्रवादी पुरस्कृत रयत पॅनलचे १७ उमेदवार तर भाजप पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलचे १६ उमेदवारांमध्ये लढत होणार असून एक अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. यापूर्वी राष्ट्रवादीचा एक उमेदवार बिनविरोध झाला आहे. त्यामुळे १७ जागांवर निवडणूक होणार आहे.
          बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार याची उत्सुकता सर्वांना होती. सुरुवातीला १८ जागांसाठी ६४ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. ३० उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने ३४ उमेदवार निवडणूक लढतील.
राष्ट्रवादीचे निलेश भगवान लडकत हे कृषी पतसंस्था इतर मागासवर्ग मतदार संघातून बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे सतरा जागांवर निवडणूक होत आहे. शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून १८ जागांसाठी २९ उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले होते. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या शेतकरी विकास पॅनलचे १६ उमेदवार रिंगणात राहिले.
          राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत रयत पॅनलने १८ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी एक बिनविरोध झाल्याने त्यांचे सतरा उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्विवाद सत्ता बाजार समितीवर आहे. असे असले तरी देखील भाजपने इतर मित्र पक्षांना सोबत घेऊन पॅनल टाकल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-----------------
शेतकरी विकास पॅनल चे वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती चे अधिकृत उमेदवार

कृषी पतसंस्था सर्व साधारण गट
१) कोकरे दयानंद चंद्रकांत 
२) जगताप विकास तुकाराम
३) काळखैरे अमित धनंजय
४) देवकाते विठ्ठल आबासो
५) तावरे धनंजय हनुमान
६) आटोळे दीपक आप्पासो 
७) खरात दत्तू तुळशीराम 
महिला प्रवर्ग
१) गावडे अर्चना स्वप्निल 
२) सस्ते सीमा बाळासो 
भटक्या विमुक्त जाती, जमाती
१) गावडे संकेत बाळासो 
ग्रामपंचायत सर्व साधारण
१) खैरे पोपट गणपत
२) सस्ते सुनील दादासाहेब 
आर्थिक दुर्बल घटक
१) मलगुंडे भीवा ज्ञानदेव 
अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग
१) भोसले दयानंद बापूराव 
व्यापारी मतदार संघ 
१) अखलाक बशीर बागवान
हमाल मापाडी मतदार संघ
१) भरणे हनुमंत भानुदास
To Top