फलटण ! पाडेगाव ऊस संशोधन केंद्राच्या नविन ऊस विशेषज्ञपदी डॉ. राजेंद्र भिलारे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोनंद : प्रतिनिधी
महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राचे नविन ऊस विशेषज्ञ डॉ. राजेंद्र मिलारे यांनी दि. १ एप्रिल २०२३ रोजी संशोधन केंद्राचा कार्यभार घेतला. 
          डॉ. भिलारे हे महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी मध्ये सन १९९६ पासून कार्यरत आहे. पदव्युत्तर पदवीचे १० विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलेले असून ८६ संशोधन लेख प्रसिद्ध केलेले आहे. शिक्षण, विस्तार व संशोधनामध्ये अनुभव असलेले व्यक्तीमध्य पाडेगाव केंद्रास ऊस विशेषज्ञ म्हणून मिळालेले आहे. या निमित्त नविन ऊस विशेषज्ञ डॉ. राजेंद्र मिलारे यांचा स्वागत समारंभ आयोजीत करणेत आला होता. या प्रसंगी संशोधन केंद्रातील सर्व शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी तसेच शेतकरी यांच्या वतीने डॉ. राजेंद्र भिलारे यांचे हार्दिक स्वागत करणेत आले.
       संशोधन केंद्राच्या दैदीप्यमान परंपरेस अनुसरून पुढे काम करण्याचा मनोदय डॉ. राजेंद्र भिलारे यांनी व्यक्त केला. संशोधन केंद्राने प्रसारित केलेले नविन ऊस वाण फुले ऊस १५०१२ व फुले ऊस १३००७ (एमएस १४०८२) यांचा प्रसार करणे, बदलत्या हवामान परिस्थितीत कमी पाण्यात, कमी कालावधीत जास्त उत्पादन देऊ शकणारे ऊस वाण विकसीत करणे, ऊस संशोधनामध्ये नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करणे, ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करणे, ऊस व खोडवा व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा व्यापक प्रचार करणे, संशोधन केंद्राच्या विकासासाठी जास्तीत जास्त फिरता निधी वाढवून संशोधन केंद्राचे बळकटीकरण करणे, नवनवीन तदर्थ प्रकल्प राबवून संशोधन केंद्रासाठी मनुष्यबळ उपलब्ध करणे, साखर कारखान्याचे ऊस हंगाम व वाणनिहाय नियोजनात कार्यक्षम सुसुत्रता आणणे व संशोधन केंद्र अधिक शेतकरीभिमुख करणे या दिशेने संशोधन केंद्राची पुढील वाटचाल राखण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला. विद्यापीठाचे कुलगुरू मा.डॉ. पी.जी. पाटील, संशोधन संचालक डॉ. एस. डी. गोरंटीवार व संचालक (विस्तार शिक्षण) डॉ. टी. के. नरूटे यांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 
To Top