सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सुपे : दीपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे येथील (ता. बारामती) महालक्ष्मी ज्वेलर्स दरोडा व गोळीबार प्रकरणातील तीसरा सह आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेण्यात यश मिळविले असल्याची माहिती वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक सचिन काळे, पोलिस उपनिरीक्षक सलीम शेख यांनी दिली. तीनही आरोपींना बारामती येथील न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना १० एप्रिल पर्यंतची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
येथील महालक्ष्मी ज्वेलर्स हे सराफी दुकान शुक्रवारी (दि. ३१) दरोडेखोरांनी लुटण्याचा प्रयत्न केला. तरुण ग्रामस्थ व पोलिसांच्या धाडसामुळे त्याच दिवशी एका दरोडेखोरास पकडले होते. त्यानंतर पोलिसांनी रात्रीत तपासाच्या दिशा फिरवत २४ तासाच्या आत शनिवारी पहाटे दुसऱ्या दरोडेखोरास पकडण्यास पोलिसांना यश आले. त्यानंतर रविवारी तिसऱ्या सह आरोपीला पोलिसांनी खेडशिवापुर येथील लॉजवरुन मोठ्या शिताफिने पकडले.
या घटनेत पवन जगदीश विश्वकर्मा (वय २०, रा. मिर्झापूर, उत्तर प्रदेश), प्रदीप भैय्यालाल बिसेन, तर सह आरोपी कोमल नितीन गौतम ( वय २४ ) या तिघांना १० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी दिली असुन या कटात सहभागी असणारे व गाडीतुन पळुन गेलेले विष्णू पंडित, सुभाष मेश्राम सर्व राहणार गोंदिया यांच्यावर वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. यातील गौतम हा सह आरोपी हा खेडशिवापुर येथील हॉटेल रॉयल ब्लू मध्ये लपुन बसला होता. त्यामुळे पोलिसांनी मोठ्या शिताफिने आरोपीला पकडण्यात यश आले. त्याच्याकडे धारधार शस्त्र, गॅस कटर, फेस मास्क, नोजमाक्स, तीन लॅपटॉप, चांगल्या कंपनीचे मोबाईल, हॅन्ड ग्लोज तसेच स्पॉट नकाशे इत्यादी साहित्य पोलिसांना मिळाले असल्याची माहीती पोलीस उपनिरिक्षक सलिम शेख यांनी दिली.
दरोडेखोरांनी सुमारे ११ लाख, ३९ हजार, ८०० रुपयांचे दागिने पळवून चालवले होते. तर सुमारे ८३ हजार, ४०० रुपयांचे अंगठी सारखे दागिने हातात घालून गेले होते. यापैकी सुमारे साडेअकरा लाखांची दागिन्यांची पिशवी लागलीच मिळाली. गुन्ह्यात वापरलेली किया कंपनीची गाडी क्रमांक एमएच ३५ ए आर ६१२५, दोन पिस्तूल, २४ जिवंत काडतुसे व एक मोबाईल असा माल पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती शेख यांनी दिली.
.............................
COMMENTS