भोर ! कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी ८७ अर्ज दाखल : निवडणूक चुरशीची होणार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २८ एप्रिलला होणाऱ्या निवडणूकीसाठी शेवटच्या दिवशी १८ जागांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना या पक्षांचे ८७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.यामुळे येऊ घातलेली निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र आहे.
       उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवार दि.३ शेवटचा दिवस होता.सर्व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल करण्यासाठी दुय्यम निबंध कार्यालय भोर येथे मोठी गर्दी केली होती.बाजार समितीच्या १८ जागांसाठी शनिवारपर्यंत केवळ चारच उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.सोमवारी शेवटचा दिवस असल्यामुळे उर्वरित इच्छुक ८३ उमेदवारांनी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज दाखल केले.बाजार समितीची  निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता तालुक्यात चर्चेत होती.मात्र शेवटच्या दिवशी ८७ अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे दिसत आहे. निवडणुकीच्या ग्रामपंचायत मतदारसंघ व कृषी सहकारी पतसंस्था मतदारसंघाच्या उमेदवारांना शेतकरी असल्याचा दाखला आवश्यक असल्यामुळे दाखला काढण्यासाठी तहसील कार्यालयात इच्छुकांची गर्दी वाढली होती. काँग्रेस -४१, राष्ट्रवादी काँग्रेस-३४, शिवसेना -६ ,भाजपा - ६ असे चार पक्षांकडून उमेदवारी अर्ज भरले गेले आसल्याची पक्षाच्या तालुका अध्यक्षांकडून देण्यात आली.उमेदवारी अर्जांची छाननी बुधवार दि.५ होणार असून, अर्ज मागे घेण्याची तारीख २० एप्रिल आहे.

To Top