सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
कोऱ्हाळे : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील थोपटेवाडी-कोऱ्हाळे येथे भैरवनाथ यात्रेनिमित्त पार बैलगाडा शैयातीत निंबुत येथील सृष्टीप्रिया गौतम काकडे यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावला.
थोपटेवाडी-कोऱ्हाळे येथे सालाबादप्रमाणे भैरवनाथ यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जाते. यावर्षी पुणे, मुंबई, माळशिरस सांगली व सातारा या भागातून जवळपास शंभर बैलगाडी मालकांना यामध्ये सहभाग नोंदवला होता. यामध्ये एकूण २४ फेरे पार पडले.
प्रथम क्रमांकासाठी ५१ हजार, दुसऱ्या क्रमांकासाठी ३१ हजार, तिसऱ्या क्रमांकासाठी २१ हजार, चौथ्या क्रमांकासाठी ११ हजार, पाचव्या क्रमांकासाठी ७ हजार, सहाव्या क्रमांकासाठी ५ हजार तर सातव्या क्रमांकासाठी ३ हजार अशी बक्षिसे ठेवण्यात आली होती.
यावेळी झालेल्या अटातटीच्या शर्यतीत निंबुत येथील सृष्टीप्रिया गौतम काकडे यांच्या बैलगाडीने प्रथम, वाठार कॉलनीच्या माऊली पाखऱ्या ग्रुपने द्वितीय, कळस च्या अनिशा पाटील यांच्या बैलगाडीने तृतीय, शॉर्य दैवत गोवेकर यांच्या बैलगाडीने चौथा, खंडाजच्या प्रणव आटोळे यांच्या बैलगाडीने पाचवा, चिकू पाटील यांच्या बैलगाडीने सहावा तर तेजस मारुती खोमणे यांच्या बैलगाडीने सातवा क्रमांक पटकावला.