सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : महेश जगताप
अगदी लहानपणापासूनच बकऱ्यांच्या मागे काठी घेऊन धावणे, काठीने दगड मारण्याचा खेळ खेळणे, दगड हातात घेऊन पीचींग करणे, हुंदडणे पण त्याच काठीच्या आकाराची स्लगर कधी भारतीय संघाचा खेळाडू नव्हे तर भारतीय संघाचा कर्णधार बनवेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. बारामती तालुक्यातील तरडोली येथील रेश्मा पुणेकर यांच्याशी 'सोमेश्वर रिपोर्टर' प्रतिनिधीने साधलेला खास संवाद.
ही कथा आहे मेंढपाळ कन्येच्या संघर्षाची...... या संघर्षाने आजपर्यंत दोन आंतरराष्ट्रीय सामने, चीन आणि हाँगकाँग या देशात खेळले आहेत तर एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल २३ राष्ट्रिय, सामन्यात महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व केलेले आहे. २८ राज्यस्तरीय सामने तसेच ४ गोल्ड मेडल, ६ रजत पदक, ३ कास्य पदक आणि महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार प्राप्त केलेला आहे आणि सर्वात शेवटचे ध्येय भारतीय संघाचे नेतृत्व करणं हॉंगकॉंग, चिन सारख्या आगळ्यावेगळ्या देशात जाऊन दोन वेळा एशियन स्पर्धा खेळून आलेली रेश्मा पुन्हा एकदा हॉंगकॉंग सारख्या देशात होणाऱ्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय महिला एशियन कप २०२३ या स्पर्धेत कर्णधार म्हणून नेतृत्व करणारी रेश्मा एका बारामतीच्या कायम जिरायती आणि दुष्काळी भागात जन्माला येऊन आर्थिक परिस्थितीच्या कंबरठ्यावर उभे राहून स्वतःचा खेळ रुपी वलय निर्माण करणारी एक संघर्षशील, धैयशिल, कृतिशील आंतरराष्ट्रीय खेळाडूची जीवनकथा.
ती खेळाडू म्हणजे रेश्मा शिवाजी पुणेकर आज एवढे सारे खेळ रुपी आयुष्य असून सुद्धा पुन्हा एकदा परिस्थिती तोंड वासून उभी आहे तिसऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी लागणाऱ्या खर्चासाठी. आज रेश्मा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे शारिरीक शिक्षण विभागात एम. पी. एड ह्या वर्गात शिकत असून आजही स्पर्धेमध्ये मिळालेले करंडक, मिडल, प्रमाणपञे, अश्या मोल्यवान तिच्या आयुष्याच्या शिदोर्या ठेवण्यासाठी लाकडी कपाट सुद्धा तिच्याजवळ नाही ना आधुनिक कोणती उपकरणे साहित्य तिच्या घरामध्ये आहे आहे तर फक्त दोन जोडी बैल राब - राब राबणारे काळ्या माईच्या उत्पन्नाच्या आशेवरती रात्रीचा दिवस करत खपणारे तिचे आई-वडील मुलीच्या खेळासाठी सगळी बकरी विकली खेळासाठी रान सुद्धा विकले परंतु आजही तिची परिस्थिती काळ बनून तिच्यासमोर उभी आहे म्हणून तिच्या खेळ रुपी पंखांना बळ देण्यासाठी तुमच्या आर्थिक मदतीची आणि आशीर्वादाची गरज आहे जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर ती नक्कीच महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे नाव सुद्धा उंचावेल यात शंका नाही तरी येणाऱ्या काळात आहारासाठी , खेळण्याच्या साहित्यासाठी व इतर लागणारा खर्च तिला पेलवणारा नाही म्हणून समाजातील दानशूरांना रेश्मा पुणेकर मदतीचे आव्हान करत आहे.
रेश्मा शिवाजी पुणेकर
रा .तरडोली ,ता बारामती,जी.पुणे
A/c number - 60139937607
IFSC CODE - MAHB0001085
Branch - jalgaon kade pathar
MAHARASHTRA BANK