भोर ! मुस्लिम समाजातील बांधवांच्या विकासासाठी कटिबद्ध : आ. संग्राम थोपटे : आमदारांच्या उपस्थितीत भोरला इफ्तार पार्टी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
सामाजिक सलोखा आणि एकात्मता जपणाऱ्या भोर तालुक्यातील मुस्लिम समाजातील बांधवांचा विकास होणे गरजेचे असल्याने समाजातील बांधवांच्या विकास कामांसाठी कायमच कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम थोपटे यांनी भोर येथे केले.
     भोर शहर काँग्रेस पक्ष यांच्यावतीने मुस्लिम बांधवांसाठी रमजानच्या उपवासानिमित्त गुरुवार दि.२० जामा मस्जिद नागोबाळी येथील इफ्तार पार्टी आयोजित कार्यक्रमात थोपटे बोलत होते.उपस्थितांना विविध फळांचा उपहार देण्यात आला.यावेळी उपनगराध्यक्ष समीर सागळे,गटनेते सचिन हरणस्कर ,माजी उपनगराध्यक्ष रामभाऊ आवारे,चंद्रकांत मळेकर, नगरसेवक गणेश मोहिते ,गणेश पवार, मुस्लिम समाज अध्यक्ष काशीमभाई आतार,निसार नालबंद,डॉ. इम्रान खान ,सादिक फरास,तोशिब आतार आदींसह मुस्लिम समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
To Top