मुंबई ! राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या उत्कृष्ट संकल्पनेतून साकारलेल्या मधाचे गाव यास राज्यस्तरीय दुसरा पुरस्कार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी गतिमानता अभियानांतर्गत राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाला उत्कृष्ट संकल्पना मधाचे गाव यास राज्यस्तरीय दुसरा पुरस्कार मिळाला आहे. 
नागरी दिनानिमित्त आयोजित सह्याद्री अतिथिगृह येथे पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अन्शू सिन्हा यांनी हा पुरस्कार स्वीकारला यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप,पाटील, महेश भोसले हे उपस्थित होते.
मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अन्शू सिन्हा,उप मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप,डी आर पाटील यांचे अभिनंदन केले आहे.
राज्य शासनाच्या वतीने दर वर्षी विशेष काम करून प्रशासकीय कामात गती आणून शासनाच्या कामाचा फायदा थेट लोकांना करून दिलेल्या विशेष कार्याचा गौरव राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान राबवून शासकीय संस्था व अधिकारी कर्मचारी यांना पुरस्कार दिला जातो.
यावर्षी सदर पुरस्कार राज्याच्या खादी व ग्रामोद्योग विभागास मिळाला आहे. मधाचे गाव मांघर या गावाला रोजगारक्षम, निसर्गसंवर्धन करून स्वावलंबी केल्याबद्दल मंडळाला पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
राज्यात मधाचे गाव हि नाविन्यपूर्ण संकल्पना मंडळाच्या मुख्य अधिकारी अन्शू सिन्हा यांनी मांडली आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप, डी आर पाटील व कर्मचारी वर्गाने हि संकल्पना यशस्वीपणे राबविली आहे.
मधाच्या गावात हजारो पर्यटकांनी भेटी दिल्या असून मधमाशाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. गावातील महिला व युवकांना गावातच रोजगार उपलब्ध झाला असल्याने गाव स्वयंपूर्ण झाले आहे.
To Top