सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : विजय लकडे
नीरा रेल्वे स्टेशन मशिदी येथे सोपोनी उमेश तावस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली नीरा पोलीस प्रशासनातर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले.
रमजान महिन्यानिमित्त 28 वा उपास सोडताना मुस्लिम समाजाबद्दल असणारे नातं जपताना फराळाचे आयोजन करून नीरा पोलीस स्टेशन प्रशासनातर्फे एक आगळ वेगळं कार्य केलं. नीरा शहरांमध्ये नेहमीच हिंदू मुस्लिम समाज एकोप्याने राहिलेला आपणास दिसून येतो
यावेळी पोलीस निरीक्षक उमेश तावस्कर पोसई राहुल साबळे पोलीस हवलदार संदीप मोकाशी राजेंद्र भापकर संतोष मदने पोलीस नाईक हरिश्चंद्र करे पोलीस कॉन्स्टेबल निलेश जाधव पोलीस पाटील राजेंद्र भास्कर पोलीस मित्र रामचंद्र कर्णवर आदी उपस्थित होते.
तसेच यावेळी माजी सभापती दत्ता चव्हाण उपसरपंच राजेश काकडे संदीप धायगुडे विराज काकडे राजेश चव्हाण राजेंद्र बरकडे व जेष्ठ पत्रकार बाळासाहेब रणवरे आदींनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.या वेळी नीरा व नीरा परिसरातील पत्रकार बंधूंनी देखील इफ्तार पार्टीस उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान महिन्याचा शुभेच्छा दिल्या. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.