सोमेश्वर रिपोर्टर टीम------
जेजुरी , वार्ताहर
कै.दिनकरराव सावंत प्रतिष्ठानच्या वतीने गेली २५ वर्ष विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना जनसेवा पुरस्कार दिला जातो,यावर्षीचा जनसेवा पुरस्कार पुणे शहर येथील सामाजिक कार्यकर्त्या जयश्री करंजावणे (देशमुख)यांना जाहीर करण्यात आला असून पुरस्कार पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते दिला जाणार आहे.
या कार्यक्रमास जेजुरी नगर परिषदेच्या मा. नगराध्यक्षा विना सोनवणे ,पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते युवराज पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत,अशी माहिती पुरस्कार समितीचे अध्यक्ष, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर व दिनकरराव प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सावंत यांनी दिली.
जयश्री करंजावणे (देशमुख) या अनेक वर्ष सामाजिक कार्य करीत आहेत, यामध्ये आरोग्य शिबिरे, भव्य सांस्कृतिक कार्यक्रम, शिवजयंती मिरवणूक,गरजूंना कपडे वाटप असे अनेक उपक्रम राबवत आहेत. यावेळी पुरस्कार समितीचे सदस्य उद्योजक नगरसेवक रवीशेठजोशी, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष व आनंदी हॉस्पिटलचे संचालक डॉ सुमित काकडे मार्तंड दिवसांची मा. विश्वस्त व जेजुरी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा.नितीन राऊत व प्रतिष्ठानचे सचिव पुरंदर तालुका काँग्रेस शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रल्हाद गिरमे उपस्थित होते.