सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सुपे : प्रतिनिधी
सुपे ता. बारामती येथिल बाजारपेठेत वर्दळीच्या ठिकाणी भर दिवसा पिस्तुलचा दाख दाखवून सोन्याचे दुकानातील ऐवज पळवून नेणाऱ्या चोरट्यांना धाडसाने पकडुन देणारे नागरीक आणि समयसुचकता राखुन चोरट्याला जेरबंद करणारे वडगाव निंबाळकर पोलीस ठाणेतील अंमलदार दत्तात्रेय धुमाळ यांचा पुणे पोलिस प्रशासनाकडुन कोल्हापूर परिक्षेत्राचे विषेश पोलिस महानिरिक्षक सुनिल फुलारी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
गेल्या पंधरा दिवसापुर्वी सुपे येथिल महालक्ष्मी ज्वेलर्समध्ये सशस्त्र दरोडा टाकुन चोरटे पळुन चालले होते. तात्काळ धाडसाने दुकांचे मालकीण अश्विनी जाधव यांनी सायरन वाजवला त्यामुळे लोक जमा झाले त्यातील सागर दत्तात्रय चांदगुडे रा. पानसरेवाडी ता बारामती जि पुणे आणि अशोक भागूजी बोरकर रा. बोरकरवाडी ता. बारामती जि पुणे हे तिथं असताना दरोडेखोरांनी रिवाल्व्हर मधुन अंधाधुंध गोळीबार करून दोन गोळ्या फायरिंग केल्या त्यामधील एक गोळी सागर चांदगुडे यांना एक गोळी अशोक बोरकर यांच्या पोटाला चाटुन केली त्यामध्ये दोघे जखमी झाले होते पण त्यांचे धाडस आरोपींना गडाआड करण्यासाठी मोठे ठरले यामुळे वरील तिघांसह घडना घडली त्यावेळी समयसुचकता दाखवून एक दरोडेखोर ताब्यात घेऊन त्याचे कडून एक पिस्टल दोन मॅगझीन १८ जिवंत काडतुस हस्तगत करून जफ्त केली व त्याला अटक करून जेरबंद करणारे
पोलीस नाईक दत्तात्रय धुमाळ पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन काळे व तपास अधिकाऱ्यांचा सन्माण पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांनी प्रशंसापत्रक देऊन सन्मान केला. यावेळी पोलीस अधीक्षक अंकित गोयल अतिरिक्त पोलीस अधीक्षक आनंद भोईटे उपस्थित होते.