सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
नीरा : विजय लकडे
निंबुत ता. बारामती येथील भैरवनाथ यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या कुस्त्यांच्या जंगी मैदानात दिल्लीच्या मनीष पॉलला चितपत करत एक लाख रुपयांच्या रोख बक्षिसासह निंबुत केसरीचा 'किताब पटकावला.
निंबुत येथील ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या भव्य कुस्ती आखाड्यात फक्त पुणे जिल्हा नव्हे तर राज्यभरातून आलेल्या पैलवानांनी आपल्या खेळीने कुस्ती शौकिनांना मंत्रमुग्ध केले. दुपारी चार वाजता महाराष्ट्र केसरी मल्ल सम्राट रावसाहेब मगर महाराष्ट्र केसरी बापू लोखंडे माजी सभापती प्रमोद काकडे माजी चेअरमन शहाजी काकडे यांच्या हस्ते नारळ फोडून कुस्तीला सुरुवात झाली. सुरुवातीला लहान मुलांच्या कुस्त्या त्यानंतर मुलींच्या कुस्त्या व नंतर वजन करून लावण्यात आलेल्या या कुस्त्या आखाड्यात अनेक मल्लांनी हजेरी लावली यामध्ये काही प्रेक्षणीय कुस्त्या अशा संग्राम साळुंखे विरुद्ध शरद पवार सांगली संतोष जगताप शिवनेरी विरुद्ध दासा कुर्डूवाडी, अली रियाज सय्यद निंबुत विरुद्ध विकास पाटील सांगली या कुस्त्या प्रेक्षणीय झाल्या .
शेवटची मानाची कुस्ती निंबूत केसरी मनीष रायते पुणे विरुद्ध विक्रांत पॉल दिल्ली यांच्यात अतिशय चुरशीची लढत पाहण्यास मिळाली यामध्ये नौदर काढून घिसा डावावर पुण्याच्या मनीष रायतेने अवघ्या वीस मिनिटात दिल्लीच्या मनीष पोल्ला आसमान दाखवत नींबूत केसरी व एक लाखाचे मानकरी झाले. ही कुस्ती पाहण्यासाठी पुणे जिल्ह्यातून अनेक कुस्ती शौकिनांनी हजेरी लावली
माजी सभापती प्रमोद काकडे सोमेश्वरचे माजी चेअरमन शहाजी काकडे तसेच पंच म्हणून विकास जाधव व माऊली खोपडे यांनी काम पाहिले.
मानाचा फेटा मल्ल सम्राट महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर यांच्या हस्ते माजी सभापती प्रमोद काकडे यांना देऊन समस्त निंबूतकरांचा यावेळी गौरव करण्यात आला
यात्रा उत्सव यशस्वी होण्यासाठी समस्त ग्रामस्थ निंबूत भैरवनाथ यात्रा कमिटी निंबूत यांनी विशेष सहकार्य केले.