बारामती ! शिक्षणासाठी अनेकांनी घराची शाळा केलेले आपण ऐकले असेल...पण बारामती तालुक्यातील तरडोली येथील एका ग्रामपंचायत सदस्याच्या नेतेवाईकांनी गेल्या अनेक महिन्यांपासून चक्क शाळेचेच घर केले आहे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
मोरगाव : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील तरडोली अनेक गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इमारत जागा देण्यात आलेल्या इमारती मालकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जागा हस्तांतरण देवाणघेवाण प्रक्रियेत योग्य पद्धत अधिकाऱ्यांनी हाताळली नसल्याने जागेच्या मालकीचे प्रश्न उपस्थित होतात. असंच तूकाई नगर येथे शाळेसाठी ज्यांनी ही जागा उपलब्ध करून दिली. ती त्या शाळेत राहणाऱ्या कुटुंबातील महिलेच्या वडिलांची आहे. यामुळे शाळा हाय 'सरकार' ची पण  'जागा' आमच्याच बापाची...! अशी बोलकी प्रतिक्रिया घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका रहिवाशांनी माध्यम प्रतिनिधींना दिली.
          बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादीचे नेते दिवस-रात्र प्रयत्न करतायत. कोट्यावधी रुपयांचा निधी आल्यानंतर या निधीचा विनियोग कशा रीतीने होतो हा एक गमतीचा विषय ठरला आहे. शिक्षण विभागाच्या बेफिकीर कारभारामुळे ‘तरडोली’ या गावातून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. येथे एका प्राथमिक शाळेत गेली सात-आठ महिने एक कुटुंब परस्परच वास्तव्याला आहे. याबाबत गंभीर दखल घ्यावी अशी मागणी आहे.
     बारामती तालुक्यात प्रशासकीय यंत्रणा किती कार्यक्षम याच उत्तम उदाहरण ‘तरडोली’ या गावातून समोर आलय. या गावच्या हद्दीत तुकाई नगर परिसरात दोन ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारती आहेत. यापैकी विद्यार्थी संख्या अभावी एक शाळा बंद पडली आहे. ही इमारत अनेक वर्ष दुर्लक्षित आहे.
   गेली सात ते आठ महिने येथील ग्रामपंचायत च्या एका पदाधिकाऱ्याचे नातेवाईक या शाळेत राहत असल्याचे समोर आले. अनेक दिवस या जिल्हा परिषद अथवा शिक्षण विभागाने डोळे झाक केल्यामुळे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो. याबाबत चौकशी व्हावी अशी मागणी आहे.
      पुणे जिल्ह्यातील अनेक गावात प्राथमिक व माध्यमिक शाळेत मुलांना बसण्यासाठी वर्ग खोल्या नाहीत. तर दुसरीकडे अनेक शाळांच्या वास्तू वापराविना धुळखात पडून आहेत. काही ठिकाणी या वास्तूंचा परस्परच खाजगी वापर केला जातो. त्याला जबाबदार कोण ? असा सवाल उपस्थित झाला आहे.
-----------------
 बारामतीचे गटशिक्षण अधिकारी गप्प का ?
तरडोली येथील याप्रकरणी माहिती विचारण्यासाठी बारामतीतील गटशिक्षणाधिकारी यांना संपर्क केला. परंतु त्यांनी याबाबत मला माहित नाही सविस्तर माहिती घेऊन मग चर्चा करू असे उत्तर दिले. बारामती सारख्या संवेदनशील आणि प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या तालुक्यातील अधिकारी कार्यक्षम का ? अकार्यक्षम हा प्रश्न जाणकार लोकांनी उपस्थित केला आहे. याप्रकरणी नेमकी पुढील कारवाई काय होणार हे यामुळे समजू शकले नाही.
----------------------
ग्रामपंचायत ने घेतली तत्काळ दखल….
वरील घटनेबाबत तरडोली ग्रामपंचायत सरपंच तसेच ग्राम विकास अधिकारी यांना माध्यम प्रतिनिधींच्या मार्फत ही घटना सांगण्यात आली यानंतर याची गंभीर दखल घेऊन तत्काळ त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली तसेच या ठिकाणी अनाधिकृत पणे वापर करीत असलेल्या कुटुंबाला इमारत शासकीय असल्याने वापरणे योग्य नसल्याची समज दिली.
To Top