सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील आंबवडे खोऱ्यातील नाझरे ता. भोर येथील हनुमंत (आण्णासाहेब) बाळासाहेब चव्हाण वय -२८ आईसोबत शेळ्या - मेंढ्या चारण्यासाठी रानात गेला असताना अचानक अवकाळी पावसाची वीज अंगावर पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.या घटनेने आंबवडे खोऱ्यात हळहळ व्यक्त होत आहे.
हनुमंत बाळासाहेब चव्हाण यांचा मेंढपाळाचा व्यवसाय असल्याने आई-वडील व ते स्वतः नाझरे गाव शेजारील डोंगर परिसरात शेळ्या मेंढ्या चारण्यासाठी गेले होते. सोमवार दि.२९ चारच्या दरम्यान ढगांचा गडगडाट व विजेचा कडकडाटासह अवकाळी पावसाने सुरुवात केली. या पावसात चव्हाण यांच्या अंगावर वीज पडली.नशीब बोललो तर म्हणून हनुमंत चव्हाण यांचे आई वडील बचावले.हनुमंत चव्हाण यांची घरची घरी परिस्थिती असून त्यांच्यावर पूर्ण घराची जबाबदारी होती.
COMMENTS