भोर ! एक हाती सत्ता व विचार विकासासाठी महत्वाचे : आमदार संग्राम थोपटे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यासह शहरात काँग्रेस पक्षाचे प्राबल्य चांगले आहे.कार्यकर्ते एक दिलाने काम करत असल्याने एक ना अनेक कोट्यावधी रुपयांची विकास कामे होत आहेत.भोर शहरातील कार्यकर्त्यांनी एक हाती सत्ता तसेच एक हाती विचार विकासकामे साधन्यासाठी तसेच पूर्णत्वाकडे नेण्यासाठी महत्वाचे असते हे दाखवून दिले आहे.
    भोर शहरातील ८ कोटींच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन तसेच काँग्रेस कार्यकर्ते मेळाव्याप्रसंगी रविवार दि.२८ आमदार थोपटे बोलत होते.यावेळी शहराध्यक्ष गजानन दानवले,ख.वि.संघ सभापती अतुल किंद्रे,उपसभापती अतुल शेडगे,संचालक राजाराम तुपे,प्रवीण शिंदे,नरेश चव्हाण,तालुका महिलाध्यक्षा गीतांजली शेटे,नंदा जाधव,बंडू गुजर,गटनेते सचिन हर्णसकर,उपनगराध्यक्ष समीर सागळे,नगरसेवक तृप्ती किरवे,सोनम मोहिते,आशा रोमन,अमित सागळे,गणेश पवार,सुमंत शेटे,बजरंग शिंदे,वृषाली घोरपडे,अमृता बहिरट,स्नेहा पवार आदिंसह सर्व नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.
     थोपटे पुढे म्हणाले भोर नगरपालिकेच्या माध्यमातून भोर शहरात उत्कृष्ट काम चाललेले आहे. मागील पंचवार्षिक मधील जाहीर विकास कामांची पूर्तता विकास कामाच्या माध्यमातून केली जात आहे.मात्र महत्त्वाची वाहतुकीची समस्या, अतिक्रमणाचे प्रश्न तसेच पाण्याचा प्रश्न याची नागरिकांकडून कोणतीही तक्रार येऊ नये याची काळजी नगरपालिका प्रशासनानी घ्यावी.
To Top