सोमेश्वर रिपोर्टर टिम------
जावली : प्रतिनिधी (धनंजय गोरे)
सोमवारी दुपारच्या सुमारास केळघर परिसरात दोन तास पावसाने हजेरी लावल्याने उकाड्याने हैरान झालेल्या नागरिकांना वातावरणात गारवा निर्माण झाल्याने दिलासा मिळाला तर केळघर घाटातील मुकवली मुरा येथील वीजेचे खांब वादळी वाऱ्यासह पावसात पडल्याने काही काळ वाहतुक ठप्प झाली .
आज दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु झाल्याने केळघर घाटातील मुकवली मुरा येथील वीजेच्या तारेवर झाड पडल्याने चार विद्युत पोल वाकून तारा तुटून पडल्या यावेळी पाऊस चालू होता . तर विद्युत प्रवाहही चालू होता . याबाबतची माहिती मेढा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात कळवली . त्यानंतर तातडीने रेंगडी गावात जाऊन विद्युत प्रवाह बंद केला . व तारा हटवून वाहतुक सुरळीत केली . माञ रेंगडी व मुकवली मुरा ही गावे जावलीच्या हददीत येतात . आणि तेथून पुढे महाबळेश्वर तालुका हद्द सुरु होते . त्यामुळे अनेक वेळा अशी आपत्कालीन परिस्थितीत जावलीतील वीज वितरण कंपनीचे कर्मचारी महाबळेश्वरकडील कर्मचाऱ्यांना तुमची तक्रार सांगा . असे सांगून टाळाटाळ करतात . मात्र येथील ग्रामस्थ वीज बिल भरणा जावली ( मेढा ) येथे करत असतो . त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्याची जबाबदारीही जावली ( मेढा ) येथील कर्मचार्यांनी करावी . अशी मागणी सर्जेराव खुटेकर यांनी केली .
COMMENTS