Bhor Breaking ! खेड शिवापूरला वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश : पाच जणांवर गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
 पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापुर येथे एका लॉजवर राजगड पोलिसांनी छापा टाकीत वेश्याव्यवसायिकाचा पर्दाफाश करून पाच जणांवर राजगड पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
     खेड शिवापुरला एका लॉजवर वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खबर राजगड पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांना मिळाली.पोलिसांनी सापळा रचून धाड टाकीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या प्रमुखासह चार महिलांना ताब्यात घेतले. रामन्ना राय (वय-५६) अशी अटक करण्यात आलेल्या व्यवसाय प्रमुखाचे नाव असून तो भिगवण ता. इंदापूर येथील रहिवासी असून याबाबत हवलदार महेश खरात यांनी फिर्याद दिली.यावेळी रामन्ना प्रत्येकी ५०० रुपये देऊन वेश्यागमनाचा व्यवसाय करून घेत असल्याची महिलांनी सांगितले. ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन पाटील ,सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे ,हवालदार संतोष तोडकर, महिला हवालदार ए. एस. भांड यांच्या पथकाने केली.
To Top