भोर ! संतोष म्हस्के ! शहरवासीयांची ही कुठली पद्धत.....कुणीबी येतंय..आणि कचरा टाकून जातंय...भोर-निगुडघर रस्ता कचऱ्याच्या विळख्यात : दुर्गंधीने वाहनचालक त्रस्त

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
भोर- निगुडघर रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ - मोठे कचऱ्याचे ढीग साचले असून कचऱ्याच्या ढिगांमुळे रस्त्याच्या दुतर्फा दुर्गंधी पसरत आहे. परिणामी वाहनचालक तसेच प्रवासी दुर्गंधीमुळे त्रस्त होत आहेत.
              भोर - महाड मार्गावरील वेनवडी- निगुडघर रस्त्यावरून दररोज हजारो वाहने प्रवास करीत असतात.१२ किलोमिटर अंतरावरील मार्गावर ५ ते ६ ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा दुर्गंधीयुक्त मोठमोठे कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत.कचऱ्याच्या ढीगांमुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांच्या तसेच वाहन चालक व प्रवासी यांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधित विभागाने भोर-निगुडघर मार्गाच्या दुतर्फा कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी तसेच  रस्त्याच्या कडेला पडलेल्या कचऱ्याच्या ढीगांची विल्हेवाट लावावी अशी मागणी प्रवासी व वाहन चालकांकडून होत आहे.
To Top