भोर ! पुरूषोत्तम मुसळे यांना डॉ.मणीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
 सामाज हिताचे कार्य करीत पत्रकारीतेमध्ये चार दशकाहून अधिक काळ सेवा केल्याबद्दल पत्रकार संघ भोरचे अध्यक्ष पुरुषोत्तम मुसळे यांना पद्मश्री डॉ मणीभाई राष्ट्रसेवा पुरस्काराने सन्मानीत केले गेले.सन्मानपत्र,सन्मानचिन्ह, शाल,श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.                                                नीती आयोग भारत सरकार,मॅगसेसे पुरस्कार प्राप्त पद्मश्री डॉ .मणीभाई देसाई प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रात निस्पृहपणे योगदान देउन उल्लेखनिय काम करणा-या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो.मुसळे यांनी भोर,वेल्हे तालुक्यातील सामाजिक,शैक्षणिक,राजकीय,सांस्कृतिक,ऐतिहासिक,पर्यावरण आदी क्षेत्रातील विविध घटनांचे परखडपणे व निपक्ष वार्तांकन केले आहे.तसेच राजकीय वार्तापत्र, विश्लेषण आणि विविध विषयांवरील लेख अभ्यासपूर्ण व वाचनीय असतात.तर विविध वृत्तपत्रांत त्यांनी विपुल लेखण केले आहे.पुरस्कार पुणे येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिर येथे संस्थेचे अध्यक्ष डॉ.रविंद्र भोळे,डॉ अशोक के पाटील,सुभाष कटयारमल आदींच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण करण्यात आला.
To Top