सोमेश्वर रिपोर्टर टीम----
इंदापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत टेंभुर्णी येथील श्री माऊली शिक्षण प्रसारक व समाजसेवा मंडळ संचलित सनराईज इंग्लिश मिडियम स्कूल व लक्ष्मी-आनंद विद्यामंदिर अँड ज्यु.कॉलेज या दोन्ही प्रशालेतील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
यामध्ये सनराईज इंग्लिश मिडियम स्कूल मधील स्वरुप सत्यवान शिंदे, श्रावणी सचिन यादव, व्यंकटेश गणेश गायकवाड, शुभम सचिन थोरात, युवराज अमोल भोंग, सोहम संतोष कुलकर्णी, श्रावणी संतोष शिंदे, कार्तिकी गणेश ढगे, तनुजा विकास मस्के इ. तर लक्ष्मी-आनंद विद्यामंदिर अँड ज्यु.कॉलेज मधील इ. ५वी तील कुणाल विठ्ठल कोथमिरे, पवन मच्छिंद्र घाडगे, नूरजहाँ इरफान अली, ऋतुजा धनाजी जगताप, पवित्रा सूरज फडे, तर इ. ८ वी मधील सिद्धी प्रदिप तळे, सृष्टी राजाराम शिंदे, समर्थ सोमनाथ व्यवहारे हे सर्व विद्यार्थी शिष्यवृत्तीचे मानकरी ठरले आहेत.
या विद्यार्थ्यांचे कौतुक करीत असताना संस्थेच्या सचिवा सुरजा बोबडे मॅडम यांनी सांगितले की,खरंतर श्री माऊली शिक्षण संस्था ही विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची क्षितिजे विस्तृत करण्यासाठी, गंभीर विचार कौशल्ये विकसित करण्यासाठी आणि त्यांना जिज्ञासू आणि व्यस्त विद्यार्थी बनण्यासाठी व त्यांना यशाकरिता प्रेरित करणारी संस्था आहे. शिक्षण हे सामाजिक बदलाचे एक शक्तिशाली साधन आहे आणि पुढच्या पिढीमध्ये गुंतवणूक करून,आम्ही सर्वांसाठी उज्ज्वल आणि अधिक आशादायक भविष्य घडवू शकतो हा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना दिला.संस्थेचे चेअरमन योगेशजी बोबडे सर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत असताना म्हटले की,या विद्यार्थ्यांचे विभागीय व राज्यस्तरावरती मिळवलेले यश पाहता आम्ही “अधिकारी घडणारी शाळा” हे आम्ही पाहिलेले स्वप्न सत्यात उतरत असल्याची भावना व्यक्त केली.
यावेळी विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ संस्थेचे अध्यक्ष योगेश बोबडे साहेब, सचिवा शिवमती सुरजा बोबडे मॅडम यांनी गुणवंत विद्यार्थ्याचे अभिनंदन केले. यादरम्यान सनराइज् स्कूलचे प्राचार्य गणेश पालवे सर, लक्ष्मी-आनंदच्या उपप्राचार्या रेखा सुरवसे मॅडम, समन्वयक विकास करळे सर, जनसंपर्क अधिकारी प्रा.सागर खुळे सर व सर्व शिक्षक शिक्षिकेत्तर कर्मचारी व पालक उपस्थित होते.
COMMENTS