पत्रकार मुराद पटेल यांना 'सोमेश्वर रिपोर्टर'चा गौरव पुरस्कार प्रदान

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार मुराद पटेल यांना बारामती तालुक्यातील सोमेश्वर रिपोर्टर हा गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. 
        सोमेश्वरनगर ता बारामती येथे सोमेश्वर रिपोर्टर च्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त अयोजित स्नेहमेळाव्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ दिगंबर दुर्गाडे, सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, सोमेश्वर कारखाना उपाध्यक्ष प्रणीता खोमणे ,मा. अध्यक्ष शहाजीकाका काकडे ,मा उपाध्यक्ष सुनील भगत ,जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे ,पुरंदर राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रमुख दत्ता आबा चव्हाण ,वाणेवाडी सरपंच गीतांजली जगताप ,मा संचालक रुपचंद शेंडकर ,मा पंचायत समिती सभापती लक्ष्मण गोफणे ,,मा. सभापती नीता फरांदे उद्योजक आर एन शिंदे ,उद्योजक राजेंद्र जगताप, ईंडीया बुलीयन ज्वेलर्स असोसिएशन चे राज्य समन्वयक व बारामती सराफ असोसिएशन चे अध्यक्ष किरण आळंदीकर ,चांडाळ चौकडी फेम रामदास जगताप ,संचालक जितेंद्र निगडे , खरेदी विक्री संघाचे संचालक विक्रम भोसले,ऋषीकेश गायकवाड,वाघळवाडी सरपंच ॲड .हेमंत गायकवाड ,सतीश सकुंडे ,राष्ट्रवादी महिला सरचिटणीस सुचेता साळवे ई पदाधिकारी हजर होते .
           यावेळी बोलताना डॉ दुर्गाडे म्हणाले, सोशल मेडीयावर चॅनेलचा व युट्युब पोर्टल चा प्रचंड लोंढा असताना सलग चार वर्ष आदर्श पत्रकारिता करत साप्ताहिक  व वेब पोर्टल  सोमेश्वर रिपोर्टर ने अंधाराला भगदाड पाडण्याचे महत्वाचे काम केले असुन ते  वाळवंटातले ओॲसीस ठरत असल्याचे मत व्यक्त केले. सोमेश्वर रिपोर्टर या वेब पोर्टल व साप्ताहिक चा वर्धापनदिन  सोहळा डॉ दुर्गाडे यांचे  प्रमुख उपस्थितीत ,सोमेश्वर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम  जगताप यांचे अध्यक्षतेखाली व बारामती तालुका राष्ट्रवादी कॉंगेस चे अध्यक्ष संभाजी होळकर यांचे शुभहस्ते पार पडला त्यावेळी ते बोलत होते.
       सोमेश्वर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप म्हणाले बारामती च्या पश्चीम भागात सोमेश्वर पत्रकार गृप ने फक्त पत्रकारिता न करता खऱ्या अर्थाने  सामाजीक कार्याची मोठी चळवळ या पत्रकारानी उभी केली आहे. तत्काळ बातम्या देत असताना कोव्हीड काळ असो अथवा पुरग्रस्त असो त्यानी आजी माजी सैनिक संघाच्या सहकार्याने परिसरातील सामाजिक संस्थाच्या मदतीने गरजवंताना मोठा आधार दिला आहे अन्यायाविरुद्ध आवाज उठवत असताना सामाजिक बांधीलकीतुन सोमेश्वर रिपोर्टर ने व सोमेश्वर च्या पत्रकारानी काम केले त्यामुळे सुसंस्कृत समाज निर्माण करण्यात त्यांचे योगदान मोठे असल्याचे ही ते म्हणाले असेच अनेक वर्धापनदिन साजरे करण्याचे योग आम्हाला यावेत असेही ते म्हणाले .
     राष्ट्रवादी कॉंगेस चे संभाजी होळकर यानी या वर्धापनदिन अंक प्रकाश सोहळा साजरा करताना आपल्याला आनंद होत असुन  सोमेश्वर रिपोर्टर गृप ने  कोव्हीड काळात कोव्हीड सेंटर साठी तसेच कोरोना ग्रस्तासाठी मोठी मदत केली.बातम्यांच्या तत्काळ सेवेबरोबर समाजसेवा देखील मोठी केली हे ही आवर्जुन सांगीतले .
      चांडाळ चौकडी फेम रामभाऊ पुढारी उर्फ  रामदास जगताप यानी दिलखुलास संवाद सांगत पत्रकारितेतील अनुभव सांगत सोमेश्वर च्या भुमीत आपली कारकिर्द सुरु झाली असुन  पत्रकार दत्ता माळशिकारे ,संतोष शेंडकर ,गणेश आळंदीकर ई चे आपल्याला मार्गदर्शन लाभले असे सांगुन सोमेश्वर परिसरात दोनशे रुपयात कार्यक्रम केले मात आत्ता लोक दोन लाख द्यायला तयार झाले हे केवळ निष्ठेने सातत्यपूर्ण कष्ट केल्याने शक्य झाले आपल्या खास शैलीत रामदास जगताप यानी चांडाळ चौकडीचा डायलॉग म्हणत जिथे समस्या गंभीर तिथे सोमेश्वर रिपोर्टर खंबीर असे म्हणत सर्व वाचकाना हास्याच्या कल्लोळात त्यानी बुडवले .
     प्रास्ताविक मधे सोमेश्वर रिपोर्टर चे कायदेविषयक सल्लागार ॲड. गणेश आळंदीकर यानी २०१९ मधे साप्ताहिक सोमेश्वर रिपोर्टर सुरु केले व कोव्हीड मधे वर्तमानपत्र बंद पडल्याने  वाचकांची  वाचनाची भुक भागवण्यासाठी वेबपोर्टल सुरु करुन आज सोमेश्वर रिपोर्टर ने ६७ लाख वाचकांचा टप्पा पार केला असुन एका एका बातमीला दीड लाख व्ह्युव होतात हे मोठे यश असुन सुमारे १५ तालुके व तीन जिल्ह्यात वाचक असुन ३५ व्हाटस अप गृप मधुन एकच बातमी एकाच वेळी व्हाटस अप वर १० हजार लोक वाचतात. अशी व्यवस्था असल्याचे सांगीतले आमचे पत्रकार वीस वर्षापेक्षा जास्त काळ अनुभवाचे असल्याने आम्ही बातम्याचे अपडेट त्वरीत देवु शकतो कारण सर्व यंत्रणा शी असलेला संपर्क यामुळे हे शक्य होते पुर्वी फॅक्स च्या काळातील पत्रकारिता व आत्ता मोबाईल युगातील पत्रकारिता याचा फरक स्पष्ट करुन वाचक जाहीरातदार व हितचिंतक यांच्या प्रेमामुळे हे यश संपादन झालेचे आळंदीकर म्हणाले. 
    
To Top