सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

'सोमेश्वर रिपोर्टर'ने आदर्शवत पत्रकारिता जपली : डॉ दिगंबर दुर्गाडे : चौथ्या वर्धापनदिनाचा सोहळा दिमाखात संपन्न

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोशल मेडीयावर चॅनेल चा व यु ट्युब पोर्टल चा प्रचंड लोंढा असताना सलग चार वर्ष आदर्श पत्रकारिता करत साप्ताहिक  व वेब पोर्टल  सोमेश्वर रिपोर्टर ने अंधाराला भगदाड पाडण्याचे महत्वाचे काम केले असुन ते  वाळवंटातले  ओॲसीस ठरत असल्याचे मत पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यानी सोमेश्वरनगर येथे  व्यक्त केले.  
        सोमेश्वरनगर ता. बारामती येथे सोमेश्वर रिपोर्टर या वेब पोर्टल व साप्ताहिकच्या चौथ्या वर्धापनदिन सोहळा डॉ दुर्गाडे यांचे  प्रमुख उपस्थितीत ,सोमेश्वर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचे अध्यक्षतेखाली व बारामती तालुका राष्ट्रवादी कॉंगेस चे अध्यक्ष संभाजी होळकर यांचे शुभहस्ते पार पडला त्यावेळी ते बोलत होते.
       यावेळी सोमेश्वर कारखाना उपाध्यक्ष प्रणीता खोमणे ,मा. अध्यक्ष शहाजीकाका काकडे ,मा उपाध्यक्ष सुनील भगत ,जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे ,पुरंदर राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रमुख दत्ता आबा चव्हाण ,वाणेवाडी सरपंच गीतांजली जगताप ,मा संचालक रुपचंद शेंडकर ,मा पंचायत समिती सभापती लक्ष्मण गोफणे ,,मा. सभापती नीता फरांदे उद्योजक आर एन शिंदे ,उद्योजक राजेंद्र जगताप, ईंडीया बुलीयन ज्वेलर्स असोसिएशन चे राज्य समन्वयक व बारामती सराफ असोसिएशन चे अध्यक्ष किरण आळंदीकर ,चांडाळ चौकडी फेम रामदास जगताप ,संचालक जितेंद्र निगडे , खरेदी विक्री संघाचे संचालक विक्रम भोसले,ऋषीकेश गायकवाड,वाघळवाडी सरपंच ॲड .हेमंत गायकवाड ,सतीश सकुंडे ,राष्ट्रवादी महिला सरचिटणीस सुचेता साळवे ई पदाधिकारी हजर होते .
        डॉ दुर्गाडे यानी बातमी चा अर्थ पासुन विविध संपादकांचे बातम्या चे किस्से सांगुन पत्रकारितेची ताकद सांगीतली व  सोमेश्वर रिपोर्टर च्या टिम चे असेच देशभरात नाव गाजेल अशी खात्री देत शुभेच्छा दिल्या .
     सोमेश्वर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप म्हणाले बारामती च्या पश्चीम भागात सोमेश्वर पत्रकार गृप ने फक्त पत्रकारिता न करता खऱ्या अर्थाने  सामाजीक कार्याची मोठी चळवळ या पत्रकारानी उभी केली आहे. तत्काळ बातम्या देत असताना कोव्हीड काळ असो अथवा पुरग्रस्त असो त्यानी आजी माजी सैनिक संघाच्या सहकार्याने परिसरातील सामाजिक संस्थाच्या मदतीने गरजवंताना मोठा आधार दिला आहे अन्यायाविरुद्ध आवाज उठवत असताना सामाजिक बांधीलकीतुन सोमेश्वर रिपोर्टर ने व सोमेश्वर च्या पत्रकारानी काम केले त्यामुळे सुसंस्कृत समाज निर्माण करण्यात त्यांचे योगदान मोठे असल्याचे ही ते म्हणाले असेच अनेक वर्धापनदिन साजरे करण्याचे योग आम्हाला यावेत असेही ते म्हणाले .
     राष्ट्रवादी कॉंगेस चे संभाजी होळकर यानी या वर्धापनदिन अंक प्रकाश सोहळा साजरा करताना आपल्याला आनंद होत असुन  सोमेश्वर रिपोर्टर गृप ने  कोव्हीड काळात कोव्हीड सेंटर साठी तसेच कोरोना ग्रस्तासाठी मोठी मदत केली.बातम्यांच्या तत्काळ सेवेबरोबर समाजसेवा देखील मोठी केली हे ही आवर्जुन सांगीतले .
      चांडाळ चौकडी फेम रामभाऊ पुढारी उर्फ  रामदास जगताप यानी दिलखुलास संवाद सांगत पत्रकारितेतील अनुभव सांगत सोमेश्वर च्या भुमीत आपली कारकिर्द सुरु झाली असुन  पत्रकार दत्ता माळशिकारे ,संतोष शेंडकर ,गणेश आळंदीकर ई चे आपल्याला मार्गदर्शन लाभले असे सांगुन सोमेश्वर परिसरात दोनशे रुपयात कार्यक्रम केले मात आत्ता लोक दोन लाख द्यायला तयार झाले हे केवळ निष्ठेने सातत्यपूर्ण कष्ट केल्याने शक्य झाले आपल्या खास शैलीत रामदास जगताप यानी चांडाळ चौकडीचा डायलॉग म्हणत जिथे समस्या गंभीर तिथे सोमेश्वर रिपोर्टर खंबीर असे म्हणत सर्व वाचकाना हास्याच्या कल्लोळात त्यानी बुडवले .
     प्रास्ताविक मधे सोमेश्वर रिपोर्टर चे कायदेविषयक सल्लागार ॲड. गणेश आळंदीकर यानी २०१९ मधे साप्ताहिक सोमेश्वर रिपोर्टर सुरु केले व कोव्हीड मधे वर्तमानपत्र बंद पडल्याने  वाचकांची  वाचनाची भुक भागवण्यासाठी वेबपोर्टल सुरु करुन आज सोमेश्वर रिपोर्टर ने ६७ लाख वाचकांचा टप्पा पार केला असुन एका एका बातमीला दीड लाख व्ह्युव होतात हे मोठे यश असुन सुमारे १५ तालुके व तीन जिल्ह्यात वाचक असुन ३५ व्हाटस अप गृप मधुन एकच बातमी एकाच वेळी व्हाटस अप वर १० हजार लोक वाचतात. अशी व्यवस्था असल्याचे सांगीतले आमचे पत्रकार वीस वर्षापेक्षा जास्त काळ अनुभवाचे असल्याने आम्ही बातम्याचे अपडेट त्वरीत देवु शकतो कारण सर्व यंत्रणा शी असलेला संपर्क यामुळे हे शक्य होते पुर्वी फॅक्स च्या काळातील पत्रकारिता व आत्ता मोबाईल युगातील पत्रकारिता याचा फरक स्पष्ट करुन वाचक जाहीरातदार व हितचिंतक यांच्या प्रेमामुळे हे यश संपादन झालेचे आळंदीकर म्हणाले. 
    मान्यवरांचे स्वागत कार्यकारी संपादक पत्रकार दत्ता माळशिकारे ,महेश जगताप, युवराज खोमणे ,गणेश आळंदीकर हेमंत गडकरी ,चिंतामणी क्षीरसागर,वसंत मोरे ,सचीन पवार ,सोमनाथ लोणकर ,संतोष भोसले, विजय लकडे ई पत्रकारानी केले .गड किल्ले गृपचे उद्योजक दिपक साखरे ,ॲड नवनाथ भोसले ,अमर होळकर ,प्रमोद वायाळ, नितीन यादव, दिपक भोसले, मिलिंद कांबळे आदीनी ही शुभेच्छा दिल्या .
      यावेळी लोकमत पत्रकार मा मुराद पटेल जे आपत्ती व्यवस्थापन समिती खंडाळाचे अध्यक्ष आहेत त्यानी कोव्हीड काळात दिलेल्या योगदानाबद्दल व अनेकाना दिलेल्या जीवदानाबद्दल त्याना सोमेश्वर रिपोर्टर पुरस्काराने गौरवण्यात आले . 
     सुत्रसंचालन युवराज शिन्दे यानी केले तर आभार हेमंत गडकरी यानी मानले .

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7047,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : 'सोमेश्वर रिपोर्टर'ने आदर्शवत पत्रकारिता जपली : डॉ दिगंबर दुर्गाडे : चौथ्या वर्धापनदिनाचा सोहळा दिमाखात संपन्न
'सोमेश्वर रिपोर्टर'ने आदर्शवत पत्रकारिता जपली : डॉ दिगंबर दुर्गाडे : चौथ्या वर्धापनदिनाचा सोहळा दिमाखात संपन्न
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEgmIWF_7Q6B7tqrDsPkcophhi5rks82aFNfmfu3x3QTBDq17vXwfc8y7XZVMx16wADSN0hinLJRavqdMBoXxXDO_PNiI4Z4uLbe-RZlP1dHok89yMocqe5ZOCXACO2ifiqEzdGVA0z-oMqHtSTe0KnuJjmvzstJCb3JSiL3JEdemioLLcuHgwwuLC_p0g
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEgmIWF_7Q6B7tqrDsPkcophhi5rks82aFNfmfu3x3QTBDq17vXwfc8y7XZVMx16wADSN0hinLJRavqdMBoXxXDO_PNiI4Z4uLbe-RZlP1dHok89yMocqe5ZOCXACO2ifiqEzdGVA0z-oMqHtSTe0KnuJjmvzstJCb3JSiL3JEdemioLLcuHgwwuLC_p0g=s72-c
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2023/05/blog-post_77.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2023/05/blog-post_77.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy