सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्यातील डोंगररांगांतील जंगलामध्ये मोठ्या प्रमाणावर वन्यप्राणी तसेच पशुपक्षी आहेत. या वन्यप्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी वणवण लक्षात घेवून तसेच पाणी हेच जीवन समजून पत्रकार संघ भोरच्या पदाधिकाऱ्यांनी उत्रोली ता.भोर येथील कृत्रिम पानवठयात ६ हजार लिटर पाणी सोडून वन्यप्राणी व पशुपक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली.
सध्या सर्वत्रच कडक उन्हाचा तडाखा वाढला असल्याने मानवासह वन्यप्राणी,पशुपक्षी यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.मात्र डोंगर रांगांमधील जलस्त्रोत आटल्याने वन्यप्राणी तसेच पशुपक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत आहे.तहानलेल्या वन्यप्राण्यांची तसेच पशुपक्षांची दक्षता घेत पत्रकार संघ भोरच्या पदाधिकाऱ्यांनी वनविभागाच्या कृत्रिम पानवट्यात टँकरद्वारे ६ हजार लिटर पाणी सोडले.तर पुढील काळात पाऊस पडेपर्यंत विविध ठिकाणी वन्यप्राण्यांसाठी पाण्याची गरज भासल्यास काही पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्याचे पत्रकार संघ भोरचे अध्यक्ष पुरुषोत्तम मुसळे यांनी सांगितले.यावेळी पत्रकार संघ भोरचे उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, सचिव संतोष म्हस्के,खजिनदार दत्तात्रय बांदल, सहसचिव कुंदन झांजले,सहखजिनदार विक्रम शिंदे,रुपेश जाधव,सदस्य दीपक पारठे, ज्ञानेश्वर जेधे,महेश उभे,वनरक्षक एस.के.होनराव,के.पी. देठे,वनमजूर अशोक चव्हाण,प्रशांत पोळ,बाळू किंद्रे,नवनाथ चव्हान ,किरण बरदाडे,उपस्थित होत