भोर ! विंग येथे युवक-युवतींसाठी मोफत व्यावसायिक प्रशिक्षण

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तसेच खंडाळा तालुक्याच्या हद्दीवर असणाऱ्या विंग (महांगरेवस्ती) ता.खंडाळा येथे रियटर इंडिया ,उदय गुजर फाउंडेशन आणि स्किलसोनिक्स यांच्या माध्यमातून युवक-युवतींसाठी मोफत व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू असून अभ्यासक्रम कालावधी १५ दिवस ,१ महिना व २ महिने असा आहे.
      या प्रशिक्षणासाठी दहावी,बारावी ,पदवीधर व डिप्लोमा असे शिक्षण अपेक्षित असून या व्यावसायिक प्रशिक्षणामध्ये वेल्डिंग,फिटर तसेच इलेक्ट्रिकलचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.मुख्य आकर्षण थेरी व प्रॅक्टिकल प्रशिक्षण,उत्कृष्ट पायाभूत सुविधा आणि सुसज्य कार्यशाळा, स्विझर्लंड प्रमाणे तज्ञ प्रशिक्षक,स्विझर्लंड अध्यापन शास्त्र आणि प्रशिक्षण पद्धती, अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र तर नोकरी मिळवण्यासाठी साहाय्यक केले जाणार आहे. संपर्कासाठी या नंबरचा उपयोग करावा ९९८७४९१२६०,७६२०७९१३२९.
To Top