सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
अहमदनगर : प्रतिनिधी
आमदार रोहित पवार यांच्या मुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती ३१ मे रोजी चौंडी ता.जामखेड येथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा कट रोहित पवार आखत आहेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीचा कार्यक्रम प्रथमच सरकारच्यावतीने त्यांच्या जन्मगावी घेण्यात आला आहे या पत्रिकेत आमदार रोहित पवार यांचे नाव असताना सुध्दा रोहित पवार त्या कार्यक्रमाला आमदार म्हणून उपस्थित राहण्याऐवजी केवळ राजकारण करीत आहेत. त्यामुळे पोलिस प्रशासनाने याची योग्य ती दखल घ्यावी असे यशवंत ब्रिगेडचे अध्यक्ष बापूराव सोलनकर यांनी अहमदनगर चे पोलिस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे,
कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार आहेत कार्यक्रम सरकारच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. त्यांचे पत्रिकेत नाव असताना सुध्दा रोहित पवार वेगळा कार्यक्रम घेण्याचं राजकारण करीत आहेत. महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने धनगर व बहुजन बांधव लाखोंच्या संख्येने उपस्थिती लावतात. म्हणून आमदार रोहित पवार यांच्यामुळे कार्यक्रमाला गालबोट लागेल याची पोलिस प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी. असे बापूराव सोलनकर यांनी निवेदनाद्वारे कळवले आहे.