बारामती ! प्रदीप कदम ! महाराष्ट्रातून हरवत चाललाय..गरिबांचा सांताक्लॉज..! इंटरनेटच्या वाढत्या युगात महाराष्ट्राची संस्कृती असलेला 'वासुदेव, हरवतोय

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अभिमान,भल्या पहाटे हातात चिपळ्या,काखेत झोळी,गळ्यात तुळशीची माळ,डोक्याला मोरपिसाची विणलेली नक्षीदार टोपी , पांढरा सदरा नेसलेल धोतर आणि मुखात एकनाथ तुकारामांची अभंग गात गावाच्या वेशी पासून ते गावाच्या शेवटच्या टोकापर्यंत देतील ते दान घड सारा गाव जागा करीत येणारे हे "वासुदेव"
        सध्याची परिस्थिती बघता विज्ञानाच्या युगात काळ पुढे जास्त असताना कुठ तरी ही मंडळी आणि ही परंपरा लोप पावत असताना दिसून येतीय. नाताळच्या दिवशी 25 डिसेंबरला लाल पांढरा रंगाचा ड्रेस घालून येणारे ते सांताक्लॉज हेच त्या चिमुकल्यांना नवल वाटत..पण खरे बघायला गेला तर महाराष्ट्राच्या प्राचीन प्रथा परंपराच कल्पना आणि त्यांची अचूक माहिती देणं हे महत्वाचं ठरेल.
   याचप्रमाणे पिंगळा,वासुदेव, कुरमुडे अशा अनेक परंपरा ह्या  प्राचीन प्रथा परंपराच वाव देणे हे प्रत्येक महाराष्ट्रीयन नागरिकच कर्तव्य राहील. 
To Top