पुरंदर ! सर्वसामान्य जनतेसाठी सहकारी पतसंस्था व निधी बँकांची आवश्यकता आहे. आ. संजय जगताप

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
 निरा : प्रतिनिधी
सर्वसामान्य माणसाला बँका कर्ज देत नाहीत त्यासाठी सहकारी पतसंस्था व निधी बँकांची नितांत आवश्यकता आहे असे प्रतिपादन निरा येथे शिवस्वामी अर्बन मल्टीपर्पज निधी लिमिटेड बँकेच्या उद्घाटन प्रसंगी पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी व्यक्त केले.
              यावेळी बोलताना आमदार संजय जगताप म्हणाले इथून पुढे सहकारी पतसंस्था व निधी बँकांनी पारदर्शक व स्वच्छ कारभार करून सर्वसामान्य माणसाच्या उपयोगी पडून व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करावेत.
नीरा येथे शिव स्वामी अर्बन मल्टीपर्पज निधी बँकेचे संस्थापक अध्यक्ष अरुण वाघमोडे यावेळी बोलताना निधी बँकेची स्थापना व्यापार मित्रांच्या विचारातून झालेली असून सर्व  महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण करून व्यापार क्षेत्रात प्रवेश केला व्यापार हेच प्रेरणास्थान असल्याने व्यवसाय वाढीसाठी भांडवल हीच समस्या होती यासाठी सर्वजणांनी एकत्र येऊन सर्वसामान्यांना व्यवसायासाठी भांडवल पुरवठा कसा करता येईल याच विचारातून निधी बँकेची स्थापना केली. 
यावेळी प्रमुख उपस्थितीत पिडीसीसी बँकचे चेअरमन दिगंबर दुर्गाडे, ज्येष्ठ नेते श्यामकाका काकडे, लक्ष्मण  चव्हाण, माजी सभापती प्रमोद काकडे, दत्ता चव्हाण, आनंदराव शेळके , सातारा जिल्हा बँक रामभाऊ लेंभे,  सरपंच तेजश्री काकडे , उपसरपंच राजेश काकडे  यांच्यासह माजी सभापती सुजाता दगडे , डॉ  वसंत दगडे , संदीप धायगुडे , गंगाराम जगदाळे यांच्यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. उपस्थितांचे आभार कुणाल ढमाळ यांनी मानले.
To Top