सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
कर्नाटक राज्यातून पुणेकडे एका आयशर टेम्पो गाडीने ७० लाखांचा गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती राजगड पोलिसांना शुक्रवार दि.२६;मिळताच राजगड पोलिसांनी तात्काळ सापळा रचून आयशर टेम्पो एमएच ११ सीज ४०७५ चा सिने स्टाईल पाठलाग करून खेड शिवापुर टोल नाका येथे नाकाबंदी करून पकडला.यात ७० लाख रुपयांचा गुटखा विमल पान मसाला जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक पुणे ग्रामीण अंकित गोयल यानी अवैध धंदयावर परीणामकारक कारवाई करनेबाबत आदेशित केलेनंतर राजगड पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत एक लाल रंगाचा आयशर टेम्पो एम.एच.११.सी.ज.४०७५ यामध्ये कर्नाटक राज्यातून गुटखा भरून पुणे बाजूकडे येत असल्याची माहिती मिळाली.त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, नितीन खामगळ,हवालदार महेश खरात राहुल कोल्हे ,तुषार खेंगरे, गणेश लडकत यांच्या पथकाने टेम्पो राजगड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आला असता त्याचा पाठलाग करून पकडला.टेम्पोमध्ये पकडून त्यामधील टेम्पासह गुटखा ७० लाख रूपयाचा विमलपान मसाला पकडण्यात आला. आरोपी नामदेव मधुकर लवट (वय २८) ग. निजामपूर, ता. सांगोला, जि. सोलापूर , चेतन दत्तात्रय खाडकर वय १९ वर्ष, रा. रा. निजामपूर, ता. सांगोला, जि. सरापूर यांना अटक करण्यात आली.तसेच इतर आरोपी शकीर निसार अलीमुट्ठी, स. विजापूर, राज्य कर्नाटक, सद्दाम महबूब कातवाल मंगाली, विज्ञापुर राज्य कर्नाटक अशी निष्पन्न झाली आहेत.