सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
खंडाळा : प्रतिनिधी
अखंड हिंदुस्तानचे दैवत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा पळशी येथे मोठ्या जल्लोषात पार पडला.
जय श्रीराम सोशल फाउंडेशन व ग्रामस्थ मंडळ पळशी यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सकाळी पळशी गावात ज्योतचे आगमन झाल्यानंतर पूजन करून छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीचा अभिषेक केला गेला. सायंकाळी मुख्य कार्यक्रमाची सुरुवात झाली यामध्ये पारंपारिक वाद्य ढोल-ताशांच्या गजरात तसेच 'जय श्रीराम जय शिवराय' च्या जयघोषात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली, या जन्मोत्सव सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असलेले 'श्री डान्स अकॅडमी', वाई चे 50 कलाकारांनी 'अफजलखान वध' देखावा सादर केला. अंगावर शहारे आणणारा हा देखावा पाहून ग्रामस्थ जागेवरच उठून उभे राहिले. दरवर्षी जय श्रीराम सोशल फाउंडेशन यांच्यावतीने दिला जाणारा 2023 चा 'धर्मवीर योद्धा' हा पुरस्कार ज्येष्ठ गोरक्षक पंडित दादा मोडक यांना देण्यात आला. गोरक्षण क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
त्याचबरोबर पळशी गावातील तरुण यशस्वी उद्योजकांचाही सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. उद्योजकांचा सत्कार हा खरोखर आदर्शवत असल्याने गावातील अन्य युवकांनी हे त्यांच्याप्रमाणेच व्यावसायिक जीवनात प्रगती करावी असा आदर्श निर्माण करण्याच्या दृष्टीने हा पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमासाठी भूषण शिंदे शिवसेना तालुकाप्रमुख, मोहन भरगुडे, विठ्ठल राऊत, विलास भरगुडे, उत्तमराव भरगुडे, अंकुश राऊत, नवनाथ भरगुडे ग्रामपंचायत सदस्य पळशी, तुषार भरगुडे, अभिजीत घोरपडे फाउंडेशन अध्यक्ष, अमर शिंदे, सिद्धेश्वर राऊत, ह भ प मिलिंद महाराज ढम, प्रल्हाद गोळे, आत्माराम बरगुडे, सदाशिव भरगुडे, किरण राऊत , शेखर चव्हाण, विठ्ठल चव्हाण, विलास चव्हाण, अनिकेत गोळे तसेच गावातील ग्रामस्थ माता-भगिनी व तरुण मित्र मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. हा कार्यक्रम अतिशय सुंदर व यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल संपूर्ण पंचक्रोशीत या कार्यक्रमाची चर्चा झाली.