सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर पंचायत समितीच्या सभागृहात तालुका कृषी अधिकारी कार्यालय व पंचायत समिती कृषी विभाग यांच्यावतीने वेल्हे व भोर तालुकास्तरीय खरीप हंगाम नियोजन आढावा बैठकीचे आयोजन केले होते.यावेळी आमदार संग्राम थोपटे यांनी खरीप हंगामा विषयी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना करीत मार्गदर्शन केले.
आमदार थोपटे पुढे म्हणाले तालुका कृषी विभागाच्या वतीने जास्तीतजास्त शेतकऱ्यांना महाडीबीटी योजनेची माहिती देऊन त्याचा लाभ द्या.यावेळी सभेत २०२२-२३ भात पीक स्पर्धेतील पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात केला गेला.तर कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ९ ट्रॅक्टरचे पूजन आमदार थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी भोर व वेल्हा तालुक्यातील तहसीलदार,गटविकास व तालुका कृषी अधिकारी तसेच माजी सभापती लहू शेलार, उपसभापती रोहन बाठे, वसुली अधिकारी विनोद काकडे,अमोल नलावडे,सतीश चव्हाण,सुरेश राजीवडे उपस्थित होते.
फोटो - आमदार थोपटे यांच्या हस्ते ट्रॅक्टर पूजन करतानाचा फोटो पाठवत आहे.