बारामती ! सोमेश्वर कारखान्याचा सभासद 'या' तारखेला करू शकतो आडसाली ऊस लागवड : गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आडसाली ऊस लागवड १५ दिवस उशिरा तर पूर्वहंगामी १५ दिवस लवकर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने सन २०२३ -२०२४ या गाळप हंगामासाठी पाडेगाव ऊस संशोधन केंद्र व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्या सल्ल्याने ऊस लागण धोरण जाहीर केले आहे. कारखान्याने मागील वर्षीपेक्षा आडसाली लागण हंगाम १५ दिवस पुढे ढकलला आहे तर पुर्वहंगामी सप्टेंबर पासून सुरू होईल. याबाबत सोमेश्वर कारखान्याने प्रसिध्द पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. 

            आडसाली हंगामासाठी को-८६०३२ व्हीएसआय ९८०५ , कोएम  ०२६५ या ऊसजातीसाठी १ जुलै १४ ऑगस्ट दरम्यान परवानगी देण्यात आली आहे. पूर्वहंगामी ऊस लागणीकरिता को-८६०३२, व्हीएसआय ९८०५, कोएम ०२६५, व्हीएसआय ०८००५ या ऊसजातींसाठी १५ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान परवानगी दिली आहे. एमएस १०००१, को ८६०३२, व्हीएसआय ०८००५, व्हीएसआय ९८०५  या ऊसजातीसाठी १५ ते २९ फेब्रुवारी दरम्यान सुरु लागवडीसाठी परवानगी देण्यात आली आहे. १ ते ३१ मार्च उस रोप लागण करण्यास परवानगी देण्यात आली आहे. हंगाम संपेपर्यंत तुटलेल्या सर्व जातींच्या खोडवा उसाच्या नोंदी घेण्यात येणार आहेत. ऊस लागणसाठी १ ते ७ जुलै पर्यंत परवानगी देण्यात आली आहे व त्याची तारीख ७ जुलै २०२३ धरण्यात येईल त्याची क्रमवारी ड्रॉ पध्दतीने १२ जुलैला काढण्यात येणार आहे. रोप लागण ज्या दिवशी शेतात केली जाईल त्या दिवशीचीच लागण तारीख नोंद घेतली जाईल. लागण तारखेनुसार ऊस तोडीसाठी आडसाली हंगामातील सर्व ऊस जातीच्या रोपास प्राधान्याने तोड देण्यात येणार आहे. 

             सभासदांनी आडसाली ऊस सरसकट कापुन काढलेचे निदर्शनास आलेस त्या ऊसाची लागण तारीख रद्द होईल व सभासदांना त्या ऊसाची लागण तारीख पुन्हा नव्याने देणे बंधनकारक राहिल. ऊसाची नव्याने दिलेली नोंद खोडवा म्हणुन घेण्यात येईल. अशा खोडव्यास कोणत्याही प्रकारचे अनुदान लागु होणार नाही. फुले १५०१२ चे बेणेप्लॅट करून त्रिस्तरीय बेणे मळ्याद्वारे क्षेत्रात वाढ करावी. पुढील हंगाम मधील सर्व हंगामा करीता ऊस वाणास परवानगी देण्यात येणार आहे. 
To Top