सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा : ओंकार साखरे
मेढा - जावली तालुक्यातील मेढा सजाचे गांवकामगार तलाठी शंकरराव आण्णा सावंत रा. चिंचणी (ता. सातारा) यांना पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाचा जिल्हा आदर्श तलाठी पुरस्कार मिळाला असून त्याचे वितरण सातारा येथील शासकिय कार्येक्रमात महाराष्ट्र दिनी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभुराजे देसाई यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले .
या प्रसंगी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, श्री. सावंत यांच्या पत्नी सौ. उज्वला सावंत, मुलगा सुरज सावंत, मुलगी स्वाती सावंत आदी उपस्थित होते. २००९ साली महसुल विभागात तलाठी म्हणून निवड झालेल्या श्री . सावंत यांनी सुरूवातीच्या काळात खटाव तालुक्यातील वाकेश्वर . निमसोड , मोराळे, दरूज , खटाव या सजामध्ये उल्लेखनिय काम केले आहे. त्यानंतर सात वर्षापूर्वी जावली तालुक्यात बदली झाल्यानंतर कुडाळ, बामणोली सारख्या दुर्गम भागातील आपटी , मुनावळे , भागात प्रामाणिक पणे काम केले आहे. जावली तालुका तलाठी संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही ते जबाबदारी सांभाळत आहेत. सध्या ते मेढा येथे कार्यरत असून तीन वर्षातील त्यांच्या कामाचे मुल्यांकन करुन त्यांना हा पुरस्कार शासनाचे वतीने देण्यात आला आहे. सन्मानपत्र , व पाच हजाराचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराबध्दल त्यांचा केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा , आ. शिवेंद्रराजे भोसले यांचे हस्ते जवळवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने यथोचीत सत्कार करण्यात आला.
माजी पालकमंत्री आ .शशिकांत शिंदे, प्रभारी प्रांताधिकारी श्री. जाधव, तहसिलदार राजेंद्र पोळ , नायब तहसिलदार संजय बैलकर , मंडलाधिकारी संतोष मुळीक, अजिंक्यतारा कारखान्याचे व्हा. चेअरमन नामदेव सावंत , मेढा ग्रामस्थ, सातारा , जावली तालुक्यातील सर्व पदाचे पदाधीकारी कार्यकर्ते, शासकिय , निमशासकिय अधिकारी , कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.