पुण्यातील तुपे, पटेल बांधकाम व्यावसायिकांनी भागीदारालाच २ कोटी ४ लाखांचा गंडा घातला : कोंढवा पोलिसात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
हडपसर : प्रतिनिधी
 पुण्यातील पिसोळी येथे ६ बांधकाम व्यावसायिक एकत्रित येत एक बांधकाम प्रकल्प पूर्ण केला होता. मात्र याचा आर्थिक लाभ ५ जणांनीच घेतला असून उर्वरित एका बांधकाम व्यावसायिक भागीदाराला २ कोटी ४ लाखाचा गंडा घातला आसल्याने कोंढवा पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणूक करणारा विरोधात झाल्याची गुन्हा नोंद झाला आहे.
         सुभाष जयवंत कड (वय ५५ वर्षे, राहणार सर्वे नंबर १३, दुर्गामाता मंदिराजवळ कडनगर, उंड्री) असे आर्थिक फसवणूक झालेल्या बांधकाम व्यवसायिकाचे नाव आहे. तर १)नरसिंगभाई अरजनभाई पटेल, २) दिनेशभाई मगनभाई पटेल ३) श्रीमती रिकांतबेन केतन पटेल ४) अशोक शिवाजी तुपे ५) राहुल अशोक तुपे (सर्व राहणार हडपसर, पुणे) अशी आर्थिक फसवणूक केलेल्या पाच बांधकाम व्यावसायिक आरोपींची नावे आहेत.
         हडपसर येथे ६ बांधकाम व्यावसायिक  एकत्रित येत २०१२ मध्ये नयन बिल्डकॉन या नावाने कंट्रक्शन फर्मची नोंदणी केली. करारनाम्यात प्रत्येकाचे हिस्से ठरवून दिले. यात फसवणूक झालेल्या सुभाष कड यांचा २० टक्के हिस्सा होता. करारनामा झाल्यानंतर पिसोळी येथे सर्वे नंबर १५, हिस्सा नंबर २, जगदंबा भुवन रोड या जागेवर माऊंटस्केप या नावाने बांधकाम प्रकल्प सुरू केला.
           या प्रकल्पासाठी लागणाऱ्या जागेच्या खरेदीसाठी  सुभाष कड यांनी काही रक्कम दिली होती. तर बांधकाम प्रकल्पासाठी वेळोवेळी सुभाष कड यांच्याकडून रोख रक्कम व  चेकच्या स्वरूपात मोठी रक्कम पुरविण्यात आली तसेच इतर खर्चही त्यांनी केला. सुभाष कड यांना २,०४,५६,२५५ रूपये येणे बाकी आहे. परंतु आर्थिक लाभाच्या वेळी इतर ५ भागीदार बांधकाम  व्यावसायिकांना आर्थिक लाभ मिळण्याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे देत कड यांना शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक लेखाजी शिंदे करीत आहेत.
      पिसोळी येथे आम्ही सहा जणांमध्ये माउंटस्केप या नावाने बांधकाम प्रकल्प पूर्ण केला होता. यात माझा २० % हिस्सा होता परंतु या पाच भागीदारांनी मला एकही रुपया न देता सर्व फ्लॅट विकले आहेत याबाबत मी फसवणूक झाल्याबद्दल कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे असे फसवणूक झालेले बांधकाम व्यावसायिक सुभाष जयवंत कड राहणार उंड्री, पुणे यांनी सांगितले.
To Top