सोमेश्वर रिपोर्टर टीम------
काटेवाडी : प्रतिनिधी
कै सभांजीराव भिसे यांच्या स्मरणार्थ पैअविनाश भिसे यांच्या वतीने ढेकळवाडी (ता बारामती ) येथे संभाजीराव केसरी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले. सुमारे ८ एकर परिसर क्षेत्रात ऐतिहासिक बैलगाडी स्पर्धा पार पडल्या. यामध्ये सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, सातारा, मुंबई आणि कर्नाटक राज्यातून सुमारे १२६ बैलगाडी स्पर्धक सहभागी झाले होते. जिल्ह्यातील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यती पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने बैलगाडी शौकिनांनी हजेरी लावली. कोणती बैलजोडी टू व्हीलर गाडी जिंकते याची उत्सुकता लागली होती. ती आता पूर्ण झाली.
या बैलगाडी शर्यत मैदानासाठी बारामती कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष युगेंद्र पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, पोलिस निरिक्षक मोरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते आदी मान्यवरांनीही उपस्थितीत लावली होती
जिल्ह्यातील मोठ्या बैलगाडी शर्यतीमध्ये प्रथम क्रमांकाची टूव्हीलर ( अॅक्टीवा ) गाडी कोण जिंकणार, याकडे लाखो बैलगाडी शौकिनांच्या नजर लागून राहिल्या होत्या. वेगवेगळ्या २५ गटातून शर्यती पार पडल्या त्या नंतर सेमी फायनल ला २५ बैलगाडी धावल्या सेमी फायनल शर्यतीनंतर चुरशीच्या अंतीम फायनल सामन्यात बारामतीच्या सोरटेवाडी येथील संजय कुमार सोरटे यांच्या बैलजोडीने मैदान मारत प्रथम क्रंमाकाचे एक लाख रुपये किंमतीची टू व्हीलर होंडा (अँक्टिवा ) गाडी व ट्रॉफी पटकावली आहे.या विजयानंतर बैलागाडी शौकिनांनी मैदानात एकच जल्लोष केला. थरारक अशा पार पडलेल्या शर्यतींमध्ये पुरंधर तालूक्यातील नीरा येथील कै भागुजी दगडे यांच्या बैलजोडीने द्वितीय क्रमांक सह ८२ हजार र किंमतीची होंडा शाईन टू व्हीलर गाडी व ट्रॉफी पटकावली. तर सातारा, मठाचीवाडी येथील विठठल कदम यांच्या बैल जोडीने तृतीय क्रमांक मिळवत ५१ हजार रुपये व ट्रॉफी पटकाविले. तर पूणे फुरसुंगी येथील यश संदिप हरफळे यांच्या बैलजोडीने चतुर्थ क्रंमाक मिळवत ३१ हजार व ट्रॉफी बक्षिस पटकाविले तसेच बारामती च्या सोनगाव येथील शौर्यजीत सपकळ यांच्या बैल जोडीने पाचवा क्रंमाक मिळवुन २१ हजार व ट्रॉफी वरती नाव कोरले.
बैलगाडी शर्यत विजेत्यांना , पै अविभाऊ भिसे, आबासो टकले, अंकुश ठोंबरे, कार्यकारी संरपच राहूल ठोंबरे, उपसरपंच राहूल कोळेकर, सुभाष ठोंबरे, बाळासो बोरकर, रामभाऊ पिंगळे,बापुराव सोलनकर, बापूराव देवकाते, शेखर ठोंबरे, नवनाथ देवकाते, बिंटू माने, दादा गोफणे यांच्या हस्ते टूव्हीलर गाडी व रोख रकमेसह ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. बक्षिस वितरणा नंतर सोरटेवाडीतील येथील प्रथम क्रंमाकाचे विजेते संजयकुमार सोरटे यांनी गुलालाची उधळण करत फटाक्याची आतिषबाजी करत बैलगाडाची मिरवणुक काढत आंनद व्यक्त केला . तालुक्यात प्रथमच मोठ्या संख्येने समावेश झालेले बैलगाडी शर्यत अभूतपूर्व उत्साहात आणि थरारक अशा या बैलगाडी शर्यती पार पडल्या.