खंडाळा ! लोणंद बाजार समितीच्या सभापतीपदी सुनील शेळके तर उपसभापती भानुदास यादव

Admin
2 minute read
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद : प्रतिनिधी
लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सुनिल संपतराव शेळके (लोणंद) व उपसभापतीपदी भानुदास यादव (पारगाव) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
लोणंद बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलने 18 पैकी 17 जागा जिंकून निर्विवाद सत्ता स्थापन केली होती तर विरोधी भाजपच्या शेतकरी विकास परिवर्तन पॅनलला एका जागेवर समाधान मानावे लागले होते.
        लोणंद बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी आज संचालक मंडळाची बैठक होऊन त्यामध्ये आमदार मकरंद पाटील यांनी सभापतीपदी सुनिल शेळके यांना तर उपसभापतीपदी भानुदास यादव यांना संधी दिली
यावेळी नूतन संचालक सुनील शेळके, सिद्धेश्वर राऊत, यशवंत चव्हाण, नारायण धायगुडे, भगवान धायगुडे, भानुदास यादव, शिवाजी शेडगे, वैशाली घाडगे, उज्वला मांढरे, राजेंद्र नेवसे, विजय धायगुडे, संग्राम देशमुख, साहेबराव धायगुडे, संजय कदम, अरुण गालिंदे, जयेश शहा, विश्वास शिरतोडे उपस्थित होते.
          निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक देविदास मिसाळ यांनी काम पाहिले त्यांना सहकार अधिकारी ज्ञानेश्वर चव्हाण, सचिव विठ्ठल सपकाळ यांनी सहकार्य केले. नूतन पदाधिकाऱ्यांचे आमदार मकरंद पाटील, दत्तानाना ढमाळ, नितीन भरगुडे - पाटील, उदय कबुले, शामराव गाढवे, मनोज पवार, राजेंद्र तांबे, बाळासाहेब साळुंखे, डॉ. नितीन सावंत, अजय भोसले आदींनी अभिनंदन केले.
To Top