सोमेश्वर रिपोर्टर टीम------
दौंड : प्रतिनिधी
राहू (ता. दौंड) येथील कैलास विद्या मंदिर शाळेमध्ये शिकलेले सन २००१-०२ दहावी बॅच मधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला.मेळाव्यात पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
एकवीस वर्षांनंतर मेळाव्याचे प्रथमच आयोजन करण्यात आले.सरस्वती पूजन तसेच दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.शाळेच्या उपमुख्याध्यापिका हेमलता जगताप,भाग्यश्री टकले, जिजाबाई लोहकरे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामध्ये आपला स्वतःचा परिचय आता करत असलेला व्यवसाय त्याचप्रमाणे शालेय जीवनापासून आत्तापर्यंतचा कालखंड कशाप्रकारे झाला तसेच आर्थिक परिस्थितीमधून संघर्ष करत शिक्षण कसे पूर्ण केले.त्यामध्ये सध्या व्यवसाय किंवा नोकरीनिमित्त चांगल्या पदावर काम करत आहे.असे अनुभव सांगताना काही जणांना अश्रूही अनावर झाले.आपल्या उज्वल भविष्यासाठी शिक्षकांनी केलेले संस्कार या सर्व आठवणी मेळाव्याच्या निमित्ताने ताज्या झाल्या.
यावेळी संजय कुंभार,संजय टिळेकर,सागर शिंदे,नवनाथ जगताप,सुनील जाधव,रुक्साना आत्तार,शितल खेडेकर,प्रमोद कुल,तानाजी टेंगले,अनिल नवगिरे,संजय चव्हाण,पंकज झिटे,गणेश टिळेकर,विजय नवले,सोमनाथ शिंदे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन योगेश शिंदे,वैशाली नितनवरे यांनी तर आभार संदिप चव्हाण यांनी मानले.