डोक्यावर अक्षदा पडताच... पुरंदर आणि बारामतीच्या 'या' वधूवरांनी थेट वनविभाग गाठत वन्यप्राण्यांसाठी केली पाण्याची सोय

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम---  
पुरंदर : प्रतिनिधी
सध्या अनेक लग्न विविध पद्धतीने पार पडत आहेत. तसाच एक विवाह सोहळा नुकताच पार पडला असून सासवड (ता.पुरंदर) येथील विपुल शिरीष गिरमे व बारामती येथील रेणुका मनोज बोरावके यांचा विवाह सोहळा आज संपन्न झाला.
         यावेळी सोहळ्याच्या खर्चातुन सामाजिक बांधलकी जपत या नवदांपत्याने वन्यप्राण्यांसाठी वनविभागाच्या वतीने बांधण्यात आलेल्या  पाणवठ्यामध्ये पाण्याचे टँकर देऊन भावी वैवाहिक जीवनासाठी जणू वन्य जीवांचा आशिर्वादच घेतला आहे.
उन्हाची दाहकचा वाढत असल्याने वन्य प्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्त्यांजवळ येत आहेत. यातून बऱ्याचदा त्यांचा मानवाशी संघर्ष होतो. या संघर्षात प्राण्यांसोबतच मनुष्यालाही इजा पोहोचते. कधी-कधी रस्ता ओलांडताना अपघात होतात. हे टाळण्यासाठी शेतकरी कुटूंबातील नवदांपत्याने एक अभिनव उपक्रम राबवत बारामती वनविभागातील वन्यप्राण्यांसाठी पाण्याचा टॅकर उपलब्ध करुन देत वन्य जीवांची तहान भागविण्याचा प्रयत्न केला आहे.
गेल्या काही दिवसात उन्हाची काहिली वाढली असुन माणसांबरोबरच प्राण्यांच्या जीवाची काहिली झाली आहे.पाण्यासाठी वन्यप्राणी इकडे तिकडे भटकत असताना बऱ्याचदा अपघात होऊन त्यांच्या जीवावर बेतण्याचे प्रकार घडत आहेत.प्राण्यांचे असे मृत्यू रोखण्यासाठी सासवड येथील विपुल शिरीष गिरमे व बारामती येथील रेणुका मनोज बोरावके या नवदापत्याने आकस्मिक एक निर्णय घेतला. 
आज शुक्रवार(दि.12) नववधुवरांच्या डोक्यावर अक्षदा पडल्यानंतर हे दांपत्य आपल्या कुटूंबियांसह बारामती वनविभागातील तरडोली या ठिकाणी जाऊन वन्यप्राण्यांसाठी वनविभागाने तयार केलेल्या पाणवठ्यांवर टॅकरद्वारे पाणी सोडुन व्हॉटसअपवर फक्त मॅसेज न फिरवता प्रत्यक्ष कृती करुन इतरांनाही अशा कार्यासाठी प्रवृत्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सुरेश गिरमे, शिरीष गिरमे, गिरीष गिरमे, सुधीर गिरमे, ग्रामपंचायत सदस्य संतोष चौधरी, गणेश चौधरी, वनमजुर गोरख भापकर, किशोर कुदळे आदि उपस्थित होते.
To Top