सोमेश्वर रिपोर्टर टीम----
मेढा / प्रतिनिधी
जावली तालुक्यामध्ये सहकार क्षेत्रात अग्रणी असणाऱ्या वेण्णामाई नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुरेश पार्टे तर उपाध्यक्षपदी पांडूरंग धनावडे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी गणेश देशमुख यांचे अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया संस्थेच्या सभागृहात पार पडली.
वेण्णामाई पतसंस्थेची २०२३ ते २०२८ कालखंडासाठी पंचवार्षिक निवडणूक सुरेश पार्टे व पांडूरंग धनावडे यांनी पुढाकार घेवून संस्थेचे मार्गदर्शक , हितचिंतक यांच्या सल्ल्यानुसार बिनविरोध करण्यात यश मिळवले. यामध्ये सर्वसाधारण गटातून सुरेश मारूती पार्टे, ( मेढा ) ,पांडूरंग श्रीपती धनावडे, (मामुर्डी ), हणमंत बाबुराव धनावडे (करंजे), सुनिल संतु म्हस्कर ( सावली ), रामचंद्र गणपत धनावडे ( मोहाट ), सुनिल श्रीपती धनावडे ( मामुर्डी ), श्रीकृष्ण जोतीराम पार्टे ( गोंदेमाळ ), महिला राखीवमध्ये- आशा ज्ञानदेव धनावडे ( मामुर्डी ) , सुनिता सुरेश पार्टे ( मेढा ), इतर मागास -चंद्रशेखर रामचंद्र गाडवे ( मेढा ), अनुसुचित जाती - आनंदराव बाबुराव परिहार ( बिभवी ), भटक्या विमुक्त जाती जमाती मधून- राजेश मधुकर कांबळे ( मेढा ) यांची बिनविरोध संचालक पदी निवड झाली. आहे.. बिनविरोध संचालकांचे मधून अध्यक्ष , उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पार पडली. नवनिर्वाचित अध्यक्ष , उपाध्यक्ष, व सर्व संचालक, व्यवस्थापक शिवाजी शिंगटे यांचा निवडणूक निर्णय अधिकारी रमेश देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व्यवस्थापक शिवाजी शिंगटे यांनी उपस्थितांचे स्वागत करून आभार मानले.