वाई ! नागेवाडी येथून १८ वर्षीय युवती बेपत्ता

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वाई : प्रतिनिधी 
वाई तालुक्यातील नागेवाडी येथून एक १८ वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची घटना घडली. याप्रकरणी विठ्ठल शंकर येवले वय वर्ष ५२ यांनी पोलीसात तक्रार दाखल केली आहे.         
           याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की ज्योती शंकर येवले वय वर्ष १८ रा. नागेवाडी ही घरातून गाई चारण्यासाठी जाते असे सांगून बाहेर पडली ती अद्याप परत आली नाही. तिच्या कुटुंबीयांनी तिचा आजूबाजूच्या परिसरात तसेच नातेवाईक, मित्रमैत्रिणींकडे शोध घेतला मात्र ती सापडली नाही. याबाबत तिच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली असून पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
To Top