सोमेश्वर रिपोर्टर टीम----
नीरा : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी बाजार पेठ असलेल्या निरेमध्ये फर्टिलायझरर्स व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होताना दिसत आहे.
युरिया या खताची कोणतीही टंचाई नसताना युरिया हे खत विक्रीस उपलब्ध नाही, स्टॉक शिल्लक नाही , दोन दिवसात येणार आहे अशी उडवा उडविची उत्तरे शेतकऱ्यांना दिली जात आहेत. युरिया खत घेणार असेल तर इतर खतेही घ्यावी लागतील अशी अट शेतकऱ्याला घातली जात आहे. यामुळे नीरा व नीरा परिसरातील शेतकऱ्यांची मोठी कुचंबणा पहावयास मिळत आहे आल्पभूधारक शेतकऱ्यांना तर युरिया शिल्लक नही असे सांगितले जातेय.
वास्तविक महाराष्ट्र शासनाने युरिया खताबरोबर इतर खते घेण्याची सक्ती केली आहे का?? खताचा साठा शिल्लक असून ही शेतकऱ्यांच्या मागणी नुसार युरिया खताचा पुरवठा होत नाही , दुकानदार आरेरावी करतात शेतकऱ्यांना होत असलेल्या या त्रासाबद्दल तालुका कृषी अधिकारी तक्रार आल्यानंतर च कारवाई करणार काय?
वास्तविक शेती उपयोगी खते औषधे बी - बियाणे या दुकानांची वेळोवेळी तपासणी का होत नाही. अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे
-------------
तालुका कृषि अधिकारी गिरमे यांच्याशी 'सोमेश्वर रिपोर्टर'च्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असता अशा खत विक्रेत्या वर तपासणी करून कारवाई करण्यात येईल असे सांगितले.