Maharashtra HSC Result 2023 ! भोर तालुका @ ९४.५५ टक्के : सहा विद्यालयांचा निकाल १०० टक्के

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
 महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवार दि.२५ ऑनलाईन जाहीर झाला असून भोर तालुक्याचा ९४.५५ टक्के निकाल लागला. यात १०० टक्के ६ विद्यालयांचा निकाल लागल्याने ही माध्यमिक विद्यालये अव्वल ठरली आहेत.
     १२ वी परीक्षेसाठी तालुक्यातून एकूण २००१ विद्यार्थी -विद्यार्थिनी परीक्षेसाठी बसले होते त्यातील १८९२ पास झाले.शहरातील तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी शहरातील संगणक प्रशिक्षन केंद्रांवर गर्दी केली होती.अनेक माध्यमिक विद्यालय यांचा निकाल ९० टक्क्यांच्यावर असल्याने पास झालेल्या विद्यार्थ्यांचे तालुक्यातून अभिनंदन होत आहे.१२ वीचा तालुक्याचा निकाल एकून किती टक्के लागला याची माहिती भोरच्या गटशिक्षणाधिकारी यांना विचारली असता माझ्याकडे निकालाची टक्केवारी आलेली नाही.उद्या सकाळ नंतर निकालाची टक्केवारी मिळेल असे सांगण्यात आले.
To Top