आज जागतिक थायरॉईड दिवस ! आजार आणि लक्षणे तर बचावासाठी काय करायला हवंय..! डॉ विद्यानंद भिलारे सांगतात

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
आज २५ मे जागतिक थायरॉईड दिवस...आपण आज थोडी थायरॉईड या आजाराविषयी माहिती समजून घेऊयात. 
आपल्या शरीरामध्ये मानेच्या खाली पुढील भागावर फुलपाखारासारही एक ग्रंथी , छोटी परंतु अतिशय महत्वपूर्ण कार्य करते. 

कार्य : ही थायरॉईड ची ग्रंथी आपल्या शरीरातील चयापचय ची गती नियंत्रित करत असते , आपल्या शरीराला लागणारी ऊर्जा ही पेशींना वापरण्यासाठी थायरॉईड म्हणचे T3 व T4 या संप्रेरकाद्वारे समाधानकारकरित्या पार पडले जाते, आणि याचे संप्रेरक T3 व T4 याचे वापर झालेवर TSH या संप्रेरकाद्वारे जे मेंदू मधील मध्यभागी स्थित पिट्यूटरी ग्रंथीद्वारे थायरॉईड ग्रंथी चे उद्दीपन (stimulation) करून निर्मिती करून त्याचा रक्तातील स्तर नियंत्रित केला जातो
 
सामन्यात: थायरॉईड चा आजार 2 प्रकारचा-
1 Hypothyroidisum (T3 व T4 ची निर्मिती कमी असल्याने /TSH चा स्तर जास्त झालेने)
2 Hyperthyroidisum (T3 व T4 ची निर्मिती जास्त असल्याने /TSH चा स्तर कमी झालेने)

लक्षणे :
Hypothyroidisum ची लक्षणे पाहू 
थकवा , वजन वाढणे, मासिक स्त्रावतील अनियमितता - जास्त रक्तस्त्राव होणे , घोगरा आवाज इत्यादी 
Hyperthyroidisum ची लक्षणे पाहू 
चिडचिडेपणा , अस्वस्थता , थरकाप , धडधड, वजन कमी होणे , मासिक स्त्रावतील अनियमितता, ग्रंथीची गाठ , दृष्टीविकार किंवा जळजळ होणे इत्यादी 
आमच्याकडे येणाऱ्या बऱ्याच लोकांना आपल्याला याची सुरुवात झाली याची कानोकन खबर सुद्धा लागत नाही , अनेक रुग्ण तपासण्या पाहून आश्चर्य व्यक्त करतात घंबरतात , पण तसे काही घाबरण्याचे कारण नाही  , 
योग्य आहार विहार करून आपण यापासून बचाव करू शकता 
यासाठी काही औषधे घेण्याची गरज भासते परंतु जर तुम्ही योग्य आहार विहार करायला तयार असाल तर त्यावरतीही आपणस नियंत्रण करता येते 

तर पाहू आता थायरॉईड च्या बचावासाठी काय करायला हवे ते
प्रथम आहारामध्ये , 
कमी चरबीयुक्त आहार घ्या 
हिरव्या भाज्या तसेल फळभाज्यांचे प्रमाण वाढवा 
दिवसातून योग्य भुकेची वेळ समजून आहार घ्या ज्याला आम्ही biological clock म्हणतो 
भरपूर पाणी प्या 
विहार ,
चालणे किमान 4 किमी 
सूर्यनमस्कार 
वजन नियंत्रण 
ऐरोबिक व्यायाम 
डान्स इत्यादी 
मानसिकता या आजाराच्या उपचारामध्ये फार महत्वाची आहे , 
सकारात्मक दृष्टीकोन , उत्तम वाचन , अध्यात्म , मेडिटेशन अत्यंत गरजेचे आहे 

डॉ विद्यानंद मा भिलारे MD, CDM-UK
साईसेवा हॉस्पिटल : वाघळवाडी-सोमेश्वरनगर
To Top